38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराजकीयतुकोबारायांबद्दल गरळ ओकणाऱ्या बागेश्वरबाबत गप्प का? रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना संतप्त सवाल

तुकोबारायांबद्दल गरळ ओकणाऱ्या बागेश्वरबाबत गप्प का? रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना संतप्त सवाल

आपल्या अभद्र वाणीने संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करणारा बागेश्वर धामचा धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ धीरेंद्र महाराज या भंपक बाबाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील त्याच्या वादग्रस्त विधानावर आक्षेप नोंदविला आहे. यावरून रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून बागेश्वर महाराजने तुकोबारायांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त आहे. (Rohit Pawar crticize Eknath Shinde, Devendra Fadanvis say somthing about bageshwar remarks) बागेश्वर बाबाने केवळ वारकरी संप्रदायाचा अपमान केला नसून संपुर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबद्दल बोललेलं आहाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांच्या तोंडाला आजार झालाय, इतर विषयांवर बोलता लव्ह जिहादवर का नाही बोलत? सदावर्तेंची पातळी घसरली

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिली मुस्लिमांना उमेदवारी !

मौलवी, पोपकडे त्यांच्या सिद्धांताचे पुरावे मागण्याची ‘अनिस’ची हिंमत आहे का? ; ‘अनिस’वर बंदी घालण्याची महिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

 

धीरेंद्र बाबाने मागील काही दिवसांत जी मुक्ताफळे उधळली आहेत त्यावरून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच त्याने आता अकलेचे तारे तोडले असून जगद्गुरू संत तुकाराम आणि त्यांच्या पत्नीबद्दल निंदनीय भाष्य केले आहे. संत तुकाराम भक्तिमार्गाकडे कसे वळले याबाबत या बाबाने आपल्या विकृत मेंदूतील दुर्गंधीयुक्त विचारांनी संपूर्ण वातावरण दूषित केले आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा बाब म्हणत आहे की, संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची.

या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,“बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशमध्ये खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी