33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमुंबईआनंदाची बातमी : मुंबई ते पुणे प्रवास होणार प्रदूषणविरहित ; 'एमएसआरटीसी'च्या आकर्षक...

आनंदाची बातमी : मुंबई ते पुणे प्रवास होणार प्रदूषणविरहित ; ‘एमएसआरटीसी’च्या आकर्षक रूपातील ‘शिवाई’

मुंबई ते पुणे हा प्रवास आता केवळ सुखकरच नाही तर प्रदूषणविरहितही होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या ‘शिवाई’ या प्रदूषणविरहित वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावणार आहेत. हिरव्या रंगाची आकर्षक रंगसंगती असलेल्या १०० इलेक्टिक बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. मुंबई ते पुणे या शहरांदरम्यान येत्या दोन महिन्यांत या बसेसची सेवा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एमएसआरटीसी‘चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. वातावरणात प्रदूषण पसरविणाऱ्या सर्व बसेस सेवेतून हळूहळू कमी करण्यात येणार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे या बसच्या तिकीटाची किंमत ‘शिवनेरी’ बसच्या तिकीटापेक्षाही कमी असणार आहे. त्यामुळे किफायतशीर दरात प्रवाशांना मुंबई ते पुणे हा प्रवास करता येणार आहे. (Good news: Mumbai to Pune travel will be pollution free)

मुंबई ते पुणे या शहरांदरम्यान दररोज सुमारे १३ हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘एमएसआरटीसी’ने ‘शिवाई’च्या तिकीटाची किंमत शिवनेरीच्या तिकिटाच्या किमतीपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम निर्णय ‘एमएसआरटीसी’च्या संचालकीय मंडळामार्फत करण्यात येईल असे, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘फेम २’ या योजनेअंतर्गत येत्या दोन महिन्यात या ताफ्यामध्ये आणखी १५० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. या बुसेसमुळे प्रदूषणही कमी होणार आहे. तसेच इतर बसेससारखा या बसेसचा आवाजही येत नाही.त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखद होणार आहे, असे शेखर चन्ने म्हणाले.

मुंबई ते पुणे हा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार असून यासाठी आधीच्या मार्गांव्यतिरिक्त नवीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. ठाणे ते पुणे, दादर ते पुणे, बोरिवली ते पुणे, नाशिक ते पुणे (शिवाजीनगर), औरंगाबाद ते पुणे, कोल्हापूर ते पुणे (स्वारगेट) या नवीन मार्गांवरही या बसेस धावणार आहेत. मुंबई ते पुणे या प्रवासाचे तिकीट सुमारे ३५० रुपये असणार आहे.

हे सुद्धा वाचा

MPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

Super Exclusive : जिना म्हणाले होते, लोकमान्य टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य घडवून देशाची सेवा केली; दीपक केसरकरांनी वितरीत केलेल्या पुस्तकातून समोर आला इतिहास

बजेट २०२३ : ‘सेक्स’वर कर, तुमच्या आत्म्यावरही कर ; या आहेत जगातील जुलमी कर पद्धती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी