27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
HomeसंपादकीयSuper Exclusive : जिना म्हणाले होते, लोकमान्य टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य...

Super Exclusive : जिना म्हणाले होते, लोकमान्य टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य घडवून देशाची सेवा केली; दीपक केसरकरांनी वितरीत केलेल्या पुस्तकातून समोर आला इतिहास

‘बॅरीस्टर जीना म्हणाले, टिळकांनी हिंदू - मुस्लिम ऐक्य घडवून आणण्यात फार महत्वाची कामगिरी बजावली आणि या देशाची फार मोठी सेवा केली आहे. याचे फळ म्हणजे १९१६ मध्ये लखनौ काँग्रेसमध्ये झालेला ऐक्याचा करार हे होय’ असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधी यांनी हिंदु – मुस्लिम ऐक्य घडवून आणल्याचा प्रचार कर्मठ हिंदुत्ववाद्यांकडून सतत केला जातो. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधींच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळेच देशाची फाळणी झाल्याचाही आरोप केला जातो. वास्तवात मात्र महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत फारसे सक्रीय झालेले नव्हते तेव्हाच, म्हणजे १९१६ मध्ये लखनौ येथे काँग्रेसची राष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेमध्ये हिंदू – मुस्लिम ऐक्याचा ठराव पारीत करण्यात आला होता. त्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी बॅरिस्टर जिना यांनी लोकमान्य टिळकांचे जाहीर आभार मानले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेवून वितरीत केलेल्या एका पुस्तकातून हा इतिहास समोर आला आहे.

‘बॅरीस्टर जीना म्हणाले, टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य घडवून आणण्यात फार महत्वाची कामगिरी बजावली आणि या देशाची फार मोठी सेवा केली आहे. याचे फळ म्हणजे १९१६ मध्ये लखनौ काँग्रेसमध्ये झालेला ऐक्याचा करार हे होय’ असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

सन १९०९ मध्ये ब्रिटिशांनी एक कायदा पारीत केला होता. या कायद्यानुसार भारतात मर्यादीत स्वरूपात लोकप्रतिनिधी निवडण्यास मान्य करण्यात आले होते. पण त्यावेळी ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ केले. देशात या निर्णयाला विरोध होता. पण हिंदू-मुस्लिम ऐक्याला तडा जावू नये म्हणून काँग्रेसने विभक्त मतदारसंघांना मान्यता दिल्याचे या पुस्तकात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

‘गांधी गोडसे:एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र

गांधी हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला मदत केली; तुषार गांधींचा खळबळजनक दावा

Bharat Jodo Yatra : तिरंगा श्रीनगरमध्ये नेऊन फडकवणार, कोणीही अडवू शकत नाही : राहुल गांधी

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

विश्व मराठी संमेलन

विशेष म्हणजे, सन १९१६ मध्ये जेव्हा ही परिषद झाली होती, त्यावेळी गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परत आले होते. काँग्रेसमध्ये त्यांचा तेव्हा दबदबा नव्हता. लोकमान्य टिळक हेच काँग्रेसचे मोठे नेते मानले जात होते. असे असताना मुस्लिमांबद्दलचे खापर अद्यापही गांधींजींवर फोडले जात आहे. परंतु दीपक केसरकर यांनी वितरीत केलेल्या या पुस्तकामुळे एक दुसरी बाजू सुद्धा समोर आली आहे.

‘गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची’ असे या पुस्तकाचे नाव आहे. हे पुस्तक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी भाषा विभागाच्या वतीने वरळी येथे ‘विश्व मराठी संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी जगभरातील मराठी मान्यवर उपस्थित राहिले होते. या संमेलनामध्ये दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्याही अधिकाऱ्यांना सामावून घेतले होते.

संमेलनासाठी आलेल्या सगळ्या लोकांना एक छोटी बॅग देण्यात आली होती. त्या बॅगेत छोट्या मोठ्या माहिती पुस्तिका, भेट वस्तू व ‘गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची’ हे पुस्तक देण्यात आले होते. केसरकरांच्या या चांगल्या उपक्रमामुळे बॅरिस्टर जिना यांनी लोकमान्य टिळकांचे हिंदू – मुस्लिम ऐक्याबद्दल कौतुक केल्याचा इतिहासही समोर आला आहे.

लोकमान्य टिळक व बॅरिस्टर जिना या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्रीसंबंध होते. लोकमान्य टिळक तुरूंगात असताना जिना यांनी त्यांचे वकिलपत्र घेतले होते. एवढेच नव्हे तर, टिळक यांना तुरूंगातून सोडविण्याचे काम सुद्धा जिना यांनी केले होते.

विनायक सावरकर यांच्या (छोट्या) उडीचाही पुस्तकात उल्लेख

सावरकर यांनी जहाजातून उडी मारल्याची अतिरंजित कहाणी अनेकजण सांगत असतात. त्यावर ‘ने मजसी परत मायभूमीला. सागरा प्राण तळमळला’ हे त्यांचे गीत सुद्धा लोकप्रिय आहे. लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे. सावरकर यांच्या या उडीबद्दल सुद्धा या पुस्तकात नमूद केले आहे.

‘सावरकर आगबोटीच्या स्वच्छतागृहातून उडी टाकून, जवळच असलेल्या किनाऱ्याकडे झपाट्याने पोहत गेले. धक्क्यावर चढून ते पळू लागले. ब्रिटीशांनी आंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून सावरकरांना अटक केली व भारतात आणले.’ असे या पुस्तकात नमूद केले आहे. यातून सावरकर यांची ही उडी सांगितली जाते तेवढे मोठी ऐतिहासिक नाही, हे सुद्धा लक्षात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी