29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयसुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे याचे उत्तर द्या, महाराष्ट्रद्रोह्यांचे राष्ट्रद्रोह्यांना आव्हान

सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे याचे उत्तर द्या, महाराष्ट्रद्रोह्यांचे राष्ट्रद्रोह्यांना आव्हान

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. चहापानाला गेलो असतो, तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं झालं, राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टाळली, अशी खोचक टोलेबाजी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिले आहे. ते म्हणाले, ” “सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे, याचं त्यांनी उत्तर द्यावं.” महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्याची अवस्था दयनीय झाली असून राज्यातील प्रत्येकावर हजारो रुपयांचे कर्ज आहे. अमुक कोटी दिले तमुक कोटी दिले अशा फक्त घोषणाबाजी करण्यातच सरकार व्यस्त आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. (Answer who’s man is Subhash Singh Thakur, Maharashtra traitors challenge to traitors)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणून हिणवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. “दाऊदची बहिण हसीना पारकरला ज्यांनी धनादेश दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला. तरीही, अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. बरं झालं, अशा राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली,” अशा बोचऱ्या शब्दांत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांवर प्रतिहल्ला चढवला आहे. एकनाथ शिंदेंवर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला असून “सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे, याचं त्यांनी उत्तर द्यावं,” असं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

बोघेवडेपणा पुरे झाला
जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या पोकळ आश्वासनांवर टीका केली आहे. हे सरकार केवळ घोषणाबाजी करण्यातच मश्गुल आहे. ५० हजार कोटी, १ लाख कोटी, २५ हजार कोटी दिले, अशी फक्त घोषणाबाजी केली जात आहे. पण, दिले कुठं, द्यायला कटोराही नाही. त्यामुळे हे सर्व हास्यास्पद आहे, असा खोचक टोला आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या भाषणावर आव्हाड यांनी तोंडसुख घेतले आहे. ते म्हणाले, “भाषणात फक्त आम्ही सहा महिन्यांपूर्वी असे सिक्स मारले, अशी बॅटिंग केली. मात्र, आता लोक आता कंटाळले आहेत, नवीन काहीतरी बोललं पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

दिन विशेष: ‘मराठी भाषा गौरव दिना’मागे कुसुमाग्रजांचे महत्वपूर्ण योगदान; जाणून घ्या

निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड जगतापांचेच राहणार; पत्रकारांना पाकिटे!

काँग्रेस बदलली; आता नेहरूंबरोबरच आंबेडकर, बोस यांनाही स्थान; खर्गे तर सोनियांपेक्षाही मोठे!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी