28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसाहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता..! अजित पवारांनी काढली...

साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता..! अजित पवारांनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

शरद पवार यांनी राष्टवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना अश्रूही रोखता आले नसतानाच  अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालून वयामुळे शरद पवार साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार असल्याचे  सांगितले.

शरद पवार यांनी राष्टवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना अश्रूही रोखता आले नसतानाच  अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालून वयामुळे शरद पवार साहेबांना हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार असल्याचे  सांगितले. ते कालच हा निर्णय जाहीर करणार होते, मात्र मविआच्या वज्रमूठ सभेमुळे त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला होता.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सभागृहात गोंधळ घातला. साहेब, तुम्ही निवृत्त होऊ नका, अशी विनंती करीत पक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी रडत-रडत समजावण्याचा प्रयत्न केला.
हे सुद्धा वाचा :
पवारसाहेब सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाहीत. वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. नवा अध्यक्ष पवार साहेबांच्या आदेशानेच काम करेल. आमदारकी व खासदारकीचा निर्णय सुद्धा तेच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्यकांच्या पाठीशी उभे राहतील,असा का विचार करताय, असे सांगून अजित पवार यांनी साहेबांच्या जीवावरच व त्यांच्या नावावरच राष्ट्रवादी काँग्रेस चालणार असल्याचे स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी