33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकोकणवासीयांना पंतप्रधान मोदींची भेट; 5 जून मुंबई-गोवा मार्गावर धावरणार वंदे भारत

कोकणवासीयांना पंतप्रधान मोदींची भेट; 5 जून मुंबई-गोवा मार्गावर धावरणार वंदे भारत

कोकण रेल्वेचा प्रवास हा भारतातील सर्वात सुंदर प्रवासांपैकी एक असा प्रवास मानला जातो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधुन जाणारा हा रस्ता मुंबई आणि मँगलोरला जोडतो. देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस ही ३ जून पासून मुंबई-गोवा महार्गावर धावणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ताशी १८० किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमुळे मडगाव ते मुंबईदरम्यानचा प्रवास हा सात ते साडेसात तासांत पुर्ण करता येणार आहे.

उद्घाटनानंतर ही ट्रेन ५ जूनपासून नियमित प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनरकडून मिळाली आहे. मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे टिकीट सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असणार आहे. या ट्रेनमध्ये चेअर कारसाठी १,५८० रूपये तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी प्रति २,८७० रूपये मोजावे लागतील. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार टिकिटांच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांच्या दबावात उद्धव ठाकरेंनी अहमदनगरचे नामांतर केले नाही; गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

मान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार !

राज ठाकरेंचे मोदींना पत्र – ‘देश की बेटियाँ’ना न्याय द्या !

वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ५.३० वाजता सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, आणि मडगाव मध्ये दुपारी १.२५ असेल.तसेच वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी २.३५ वाजता निघेल. रत्नागिरीहून तिचा परतीच्या प्रवासाची वेळ सायंकाळी ५.३५ आहे. ही ट्रेन रात्री १०.३५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी