29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपैसाच पैसा, रक्षाबंधनाला बहिणींवर खैरात करण्याची सुवर्णसंधी !

पैसाच पैसा, रक्षाबंधनाला बहिणींवर खैरात करण्याची सुवर्णसंधी !

रक्षाबंधनासाठी एक दिवस शिल्लक असताना बाजारात वीकेंडला वेगवेगळ्या भेटवस्तू उपलब्ध झाल्या आहेत. यंदाच्या रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला भेटवस्तू देताना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची कल्पना अर्थतज्ञानी सुचवली आहे. तुम्ही वर्षाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला कपडे दागिने किंवा इतर अन्य चैनीच्या भेटवस्तू देत असाल तर यंदा काही वेगळे करता येईल. बहिणीला वित्तीय साधने भेट स्वरूपात दिल्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. त्यांना आयुष्यभर नियमित उत्पन्न मिळेल, असा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला.

बहिणीला डिजिटल सोने भेटवस्तू म्हणून द्या
डिजिटल सोने खरेदीमध्ये दागिने चोरीला जाण्याची भीती नसते. तुम्हाला सोने खरेदी करायचे समाधानही मिळते शिवाय आर्थिक सुरक्षाही उपलब्ध होते. डिजिटल सोने खरेदीने घडणाऱ्या घडणावळ खर्चाची बचत होते.

फिक्स डिपॉझिट

बँकेत बहिणीच्या नावाने मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिटिही सुरू करता येईल. व्याजही अधिक मिळते. मुदत संपल्यानंतर बहिणीला मोठी रक्कम उपलब्ध होईल.

आरोग्य विभाग

बदलत्या जीवनशैलीत लहान वयातच कित्येकांना विविध आजाराचा विळखा बसला आहे. त्यासाठी आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्ही बहिणीला अचानक उद्भवणाऱ्या खर्चातून वाचवण्यासाठी तिचा आरोग्य विमा काढून द्या, बहिणीकडे अगोदरपासूनच आरोग्य विमा असल्यास त्याचा हप्ता भरा.
हे सुद्धा वाचा 
बाजारपेठेत चांद्रयान आकाराच्या राख्या; किंमत पाहून व्हाल थक्क !

रितेशच्या स्वप्नात लग्नानंतरही जिनिलिया… पाहा गमतीशीर व्हिडिओ

यंदा देशात राखीच्या विक्रीत होणार एवढी मोठी उलाढाल!

जीवन विमा
सध्या एलआयसीची जीवन उमंग ही पॉलिसी योनीसाठी उत्तम भेट ठरू शकते. सतत 15 वर्ष एक वर्षाचा वार्षिक हप्ता भरल्यास बहिणीला दरवर्षी एक लाख रुपये मिळू शकतात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी