28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यातील जनतेसाठी सरकारची ४५ हजार कोटींची मोठी गिफ्ट

मराठवाड्यातील जनतेसाठी सरकारची ४५ हजार कोटींची मोठी गिफ्ट

४६ विधानसभा आणि ८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या आणि दोन मुख्यमंत्री राज्याला दिलेल्या मराठवड्याकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मराठवाड्यातील जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. या सरकारने मराठवाड्यातील सिंचनावर कोट्यवधीची तरतूद केली आहे. मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

मराठवाड्यात पोटॅन्शिअल आहे. देशात झेप घेणारा हा मराठवाडा. वर्षभरात आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, त्यात सर्व सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही. त्याची अंमलबजावणी करतो. आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सिंचनावर २७ हजार कोटींची तरतूद
यावेळी त्यांनी जलसंपदा आणि सिंचनावर करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती दिली. अंबड प्रवाही वळण योजना, निम्न दूधना प्रकल्प, सेलू परभणी कोटा उच्च पातळी बंधाऱ्यावर २३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जोड परळी उच्च पातळी बंधारा. महंमदा पूर उच्च पातळी बंधारा, बाभळी मध्यम प्रकल्प धर्माबाद, वाकोद मध्यम प्रकल्प फुलंब्री यावर निर्णय घेतला आहे. त्यासाठी तरतूदी केल्या आहेत.

सिंचन प्रकल्पावर एकूण १४ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर १३ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील 14 हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे १३ हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण २७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा
परराज्यात ऊस निर्यातीला बंदी; राज्य सरकारने ऊचलले मोठे पाऊल
ठरलं तर… ‘या’ दिवशी होणार शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित!
मराठवाड्याला पाणी योजनेसाठी मिळणार 2784 कोटी! मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..


एकच लक्ष्य, सरकार दक्ष 

राज्य सरकार विरोधात राज्यात वातावरण आहे. असे असताना सरकारने ‘ शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.  मराठवाड्यात ४६ विधानसभा आणि ८ लोकसभा मतदारसंघ आहेत. या विभागातील अधिकाधिक जागा जिंकण्याचे सरकारचे लक्ष्य असून त्यासाठी शिंदे सरकार दक्ष झाले आहे. त्यातूनच मराठवाड्यावर शिंदे सरकार मेहेरबान झाल्याची चर्चा राज्यात आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी