27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीय'भाजपा वाजपेयींची राहिली नाही'

‘भाजपा वाजपेयींची राहिली नाही’

राज्यात राजकीय वातावरण हे तापलं आहे. आगामी निवडणुकांचा वेध घेता राज्यात असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांत वादविवाद टीका टिप्पणी करणं सुरु आहे. सध्या राज्याचं राजकारण हे फारच खालच्या पातळीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ईडी, सीबीआयचा धाक धाकवून सत्ताधारी पक्षाने काही पक्ष फोडत इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवून घेतलं आहे. पूर्वीच्या राजकारणात सत्ता संघर्षासोबत लोकतंत्रही महत्वाचं होतं. मात्र आता ते राहिलं नाही. सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करताना भाजप वाजपेयींचा पक्ष राहिला नसल्याचं वक्तव्य शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलं होतं.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पावरांना नवाब मलिकांबाबत पत्र लिहीलं होतं. मलिकांवर देशद्रोही असल्याचे गंभीर आरोप असल्याने मलिकांना युतीत घेता येणार नाही. युतीत बाधा येण्याची शक्यता फडणवीसांनी वर्तवली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास जरुर त्यांना युतीत समाविष्ट करा. यानंतर फडणवीसांनी सत्ता येते आणि जाते शेवटी देश महत्वाचा, असे पत्रात नमूद केलं होतं. या प्रकरणी सुषमा अंधारेंनी एका भाषणात फडणवासांवर टीका केली.

हे ही वाचा

‘सरकारला फुटला घाम’; युवा संघर्ष यात्रेचं फेसबुक पेज हॅक

देशात डेंग्यूचं सावट; राज्य तिसऱ्या क्रमांकावर

वूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली ‘या’ संघाने मोजले कोट्यवधी

काय म्हणाल्या सुषमा आंधारे?

सत्ता येते आणि जाते मात्र देश महत्वाचा असे फडणवीसांनी पत्रात नमूद केलं होतं, यावर अंधारेंनी मला हसू येतं, करून करून भागलं आणि देव पूजेला लागलं. काय या म्हणण्याचा अर्थ काय काढायचा? असे म्हणत सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केला आहे. खरं तर ती भाजपा खूप वेगळी होती आणि ही भाजपा वेगळी. यावेळेस त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या काही आठवणी सांगितल्या. ज्यावेळी अटल बिहारी पार्लामेंटमध्ये राजीनामा द्यायला उभे राहिले तेव्हा सत्ता येईल आणि जाईल मात्र लोकतंत्र वाचायला हवं असं राजीनाम्यावेळी अटलजींंनी भाषण केलं. त्यावेळीची भाजपा राहिली नसून अटलजींच्या भाजपाला तिलांजली दिली, भाजपा आता अटलजींची राहिली नसल्याचं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी