30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रBHR Scam : बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, महाजन यांचा खुलासा

BHR Scam : बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, महाजन यांचा खुलासा

टीम लय भारी

मुंबई : बीएचआर घोटाळ्याशी (BHR Scam) माझा कोणताही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे. त्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप जळगावातील एकनाथ खडसे (eknath khadse) यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटींचा घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर याप्रकरणात गिरीश महाजन यांचे नाव घेतल्याने आता यासंदर्भात महाजन यांनी खुलासा दिला आहे.

महाजन म्हणाले की, या घोटाळ्यात माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. कोणाच्या पतसंस्थेत घोटाळा झाला, याचीही चौकशी व्हावी. मात्र, माझ्यावर केवळ राजकीय कारणासाठी आरोप होत आहेत. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रापेक्षा राष्ट्रीय राजकारणात रस असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्याविषयीही विचारणा करण्यात आली. त्यावर गिरीश महाजन यांनी फार बोलणे टाळले. कोणाला काय पद द्यावे, हा पवार कुटुंबीयांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी