33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रवसंतराव नाईकांपासून ते शरद पवारापर्यंत प्रत्येक मराठी नेत्याने शिवसेनेला मोठे का केले?

वसंतराव नाईकांपासून ते शरद पवारापर्यंत प्रत्येक मराठी नेत्याने शिवसेनेला मोठे का केले?

टीम लय भारी

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार पडून लवकरच भाजपचे सरकार अस्तित्वात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणे जवळजवळ निश्चित झाले आहे. पण राज्यात महाविकास आघाडी सरकारच कायम राहावे, असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. भाजपचे सरकार आल्यावर मुंबईचे काही खरे नाही, अशा आशयांचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असाच काहीसा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ‘वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरदराव पवार, विलासराव देशमुख ही माणसे वेडी नव्हती, ज्यांनी शिवसेनेला ताकद दिली. जोपर्यंत सेना आहे, तोपर्यंतच मुंबई मराठी माणसांची आहे. तो गुजराती तोतला तर टपुन बसलाच आहे. मुंबई वाचवायची असेल तर सेना वाचली पाहिजे.’ लिहिण्यात आले आहे.

तर शरद पवार हे आज या वयातही मुंबई वाचविता या दृष्टीने मैदानात उतरले आहेत. त्यांचे इतके वय असून देखील, कॅन्सरच्या जखमा घेऊन ते आज मैदानात उतरले आहेत. तर एकनाथ शिंदे सारखा व्यक्ती गद्दारी करून महाराष्ट्र विकायला निघाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना देखील विदर्भ वेगळाच करायचा आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यानुसार ते काम करत आहेत. पण या गोष्टीला सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत असल्याचे लिहिण्यात आले आहे.

जर मुंबईला वाचवायचे असेल तर, या प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे. मुंबई ही महाराष्ट्राचा श्वास आहे, मुंबई गेली की महाराष्ट्राचे तीन तेरा वाजलेच समजा. मुंबई वाचवायची असली तर काहीही करून सेना टिकवली पाहिजे, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ही पोस्ट कॉपी करून जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात आले आहे.

एकंदरीत महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष महत्वाचा का आहे? इतर पक्षातील नेत्यांनी देखील आतापर्यंत शिवसेना वाढविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी प्रयत्न का केले? इतर पक्षातील नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन मोठे का केले? याबाबत लिहिण्यात आले आहे.

Why-did-every-Marathi-leader-make-Shiv-Sena-big?

हे सुद्धा वाचा :

अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

फडणवीसांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा

पुढील दीड महिना पर्यटकांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची दारे राहणार बंद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी