32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयअजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !

अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !

टीम लय भारी

मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या करड्या शिस्ताचा अनेकांना प्रसाद मिळाला आहे. मात्र, कुटुंबवत्सल अजितदादा बुधवारी (ता. २ फेब्रुवारी) मंत्रालयात अनुभवायला मिळाले. आपल्याच कार्यालयातील चोपदाराची मुलगी आणि जावई यांना अजित पवारांना भेटायची इच्छा होती.(Ajit Dad provided a hut to go to Chopdar’s Lake)

मात्र, चोपदाराचे बोलायचे धाडस होत नव्हते; अखेर धाडस करून ते बोलले आणि अजितदादांनी त्यांची इच्छा बुधवारी पूर्ण केली. त्यांच्याशी संवाद साधत ख्यालीखुशालीही विचारली, तसेच मुलगी आणि जावयाच्या कर्तबगारीबद्दल चोपदाराचेही कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

वाईन आणि दारू यात फरक असतो; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

Big statement of Deputy Chief Minister Ajit Pawar over ‘Lockdown in Maharashtra’

उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार म्हणून सचोटीने काम करत आहेत. ते येत्या काही दिवसांत निवृत्त होत आहेत. मोरे यांची मुलगी स्नेहा हिचे चार वर्षांपूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांचे जावई साळुंखे हे अमेरिकेत आयटी कंपनीत नोकरीला आहेत. अमेरिकेत ते स्थायिक होते. मात्र, ते कोरोना महामारीमुळे भारतात परत आले

असून भारतातूनच काम करत आहेत. मोरे यांची मुलगी आणि जावई यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा व्यक्त करत होते. लेकीची आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची हिम्मत चोपदार विलास मोरे यांची होत नव्हती.

 चोपदारांनी परवा हिंमत करुन त्यांच्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं अजितदादांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी तात्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही  दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं. दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी काल अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनी सुध्दा आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला.  वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. मुलगी व जावयाच्या कर्तबगारीबद्दल अजितदादांनी चोपदार विलास मोरे यांचंही कौतुक केलं. अजितदादांनी केलेलं कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तर त्यांची लेक आणि जावई अजितदादांच्या अपुलकीमुळं अक्षरश: भारावून गेले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी