35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजबंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

टीम लय भारी

सातारा:- कालच्या  भाषणात बंडातात्या बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.(Bandatatya Karadkar in the custody of Satara Police)

अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं भाकीत

लवकरच किराणा दुकानात वाईन मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Wine sales could jump by 25% after Maharashtra govt allows sales in supermarkets

आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी सातारा पोलिस बंडातात्या कराडकरांच्या फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील राष्ट्र संत गुरुवर्य दिक्षित मठात दाखल झाले. दोन तासानंतर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना 12 वाजेपर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे.

बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले.बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली.

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असंही ते म्हणाले. “ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही,” असं बंडातात्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी