30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रअजित दादा म्हणाले, जन्माला आल्यापासून दारुचा एक ही थेंब घेतलेला नाही

अजित दादा म्हणाले, जन्माला आल्यापासून दारुचा एक ही थेंब घेतलेला नाही

टीम लय भारी

मुंबई : किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचारधीन आहे. आज विधिमंडळ अधिवेशनात अजित पवारांनी (Ajit Pawar) या निर्णयावर काही मुद्दे मांडले. यावेळी अधिवेशनात अजितदादांनी आपल्या  शैलीत दादा म्हणतात, आपल्यावर जबाबदारी आल्यामुळे राज्याच्या हिताचा आणि उत्पन्नाचा विचार करावा लागतो.

“ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे. राज्याच्या उत्पन्नाचा विचारही करावा लागतो”, सभागृतील अनेकांना हे माहिती आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

“जनतेला जर ते नको असेल, तर आमची आग्रहाची भूमिका अजिबात नाही. नागरिकांना नको त्या सवयी लागाव्यात, वेगळा समाज निर्माण व्हावा अशी भावना कुणाचीही नसते”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दारुवरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून टीका केली गेली. यावर कर कमी केल्यामुळे उलट उत्पन्न वाढल्याचं अजित पवार म्हणाले. “काही ठिकाणी दारूवर ३०० टक्के कर होता. तो आम्ही १५० टक्क्यांवर आणला. कारण जे लोक दिल्लीला जायचे, ज्यांना दारूची सवय आहे असे लोक येताना दोन्ही हातात ४-४ बाटल्या घेऊन यायचे.

… तर लगेच निवडणुका घ्याव्या लागतील”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान!

रामराजेंनी ८२ धावा केल्या, थोडक्यात सेंच्यूरी हुकली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी