32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध

टीम लय भारी  

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे(Assembly Speaker election: Governor oppose to voice voting).

राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे. काल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव, 32 जण पॉझिटिव्ह

आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नियमात बदलाची प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांकडून पत्रात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.

ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय पुणे व परळीत साकारणार, 3 कोटी रुपये निधी वितरित : धनंजय मुंडे

Maharashtra Government Firm On Holding Assembly Speaker Election Tomorrow

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी