32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयनिलंगेकरांचा अमित देशमुखांवर हल्लाबोल

निलंगेकरांचा अमित देशमुखांवर हल्लाबोल

टीम लय भारी

लातूर:- राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असताना लातूरमधून  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित देशमुख यांच्या आशीर्वादाने कोरोना काळात लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. घोटाळा  (Big scam in Latur during Corona)

कोविड काळात लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशीर्वादाने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. पीपीई किट असेल किंवा कोविड रुग्णांना देण्यात येणारा आहार असेल यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. एका पेशंटला तपासण्यासाठी एक पीपीई किट दोन हजार रुपये किंमतीची खरेदी करण्यात आला.

त्यातही मोठा घोळ करण्यात आला. तर रुग्णांना देण्यात आलेल्या आहाराचा खर्च आठ कोटी रुपये दाखवण्यात आला असून या सर्वाचा हिशोब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वारंवार मागून देखील समोर आणला जात नसल्याचं निलंगेकर म्हणाले आहेत. तसंच जिल्हा प्रशासन उडवा उडवीची उत्तरे देत असून हा सगळा भ्रष्टाचार विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशिर्वादामुळेच झाल्याचा गंभीर आरोप निलंगेकरांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

राजकीय भूमिका मांडल्याने मालिकेतून केले तडीपार, मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

SS vs BJP : संजय राऊत व शिवसेना यांची भूमिका दुतोंडी, प्रवीण दरेकर यांची टीका

UP elections: Cracks in Hindu vote upset BJP’s calculations

या सर्व बाबींचा हिशोब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वारंवार मागून देखील हिशोब समोर आणला जात नाही. जिल्हा प्रशासन उडवा-उडवीची उत्तरे देतंय. हा सगळा भ्रष्टाचार विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशिर्वादामुळेच झाल्याचा देखील गंभीर आरोप माजी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केलाय. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्याच्या सीमेवर लातूर जिल्ह्याच्या हद्दीत सर्वात मोठा जुगाराचा अड्डा देखील पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं सुरु असल्याचा देखील आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

राज्यात गुरुवारी तब्बल 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसंच 36 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी