30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयराजकीय भूमिका मांडल्याने मालिकेतून केले तडीपार, मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

राजकीय भूमिका मांडल्याने मालिकेतून केले तडीपार, मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

टीम लय भारी

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेता किरण माने हा विलास पाटलाची भूमिका साकारत आहे. किरण मानेंनी राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे(Kiran Mane expelled from serial for taking political role).

मोठ्या पडद्यावरही किरण मानेंनी अनेक भूमिकांमध्ये काम केले आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांच्या विरोधातही त्यांने अनेकदा भूमिका घेतली आहे. किरण माने लोकप्रिय अभिनेते असून ते राजकीय विचार मांडत असतात. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला काढून टाकण्यात आले असल्याचे किरण माने यांनी म्हटलं आहे(Kiran Mane has also acted in many roles on the big screen).

किरण माने म्हणाले की, “ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. त्यामुळे शिवबा- तुकोबांच्या आणि शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडंलय. मात्र या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. जर मला न्याय मिळाली नाही तर झुंडशाहीविरोधात बोलणार मी मागे पुढे पाहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोकं याविरोधात बोलण्यास समोर येतील. त्यामुळे काय करायचे हे लोकांनी ठरवावे. परंतु माझ्य़ा कोणत्याही पोस्टमध्ये मी जातीवादावर, विनाकारण पातळी सोडून टीका केलेली नाही.”

हे सुद्धा वाचा

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

राज्यभरातून महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या वादग्रस्त प्रोमोमुळे संताप व्यक्त

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Kiran Mane Shares a Heartwarming Note After Meeting Fans

त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘ काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !’ किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.

मला ट्रोल करत माझ्यावर बरीच घृणास्पद टीका केली गेली. त्यावेळी चिडून काही वक्तव्ये त्या ट्रोलर्सच्या विरोधात केली आहेत. पण मी कोणाचे नाव घेऊन अर्वाच्च शब्दात काही बोललो नाही. ही झुंडशाही आहे.”आम्ही नाटकांमध्ये काम करताना काँग्रेसवर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांवर टीका करायचो. मात्र तेव्हा काँग्रेस नेते यावर टाळ्या वाजवायचे. मात्र तेव्हा अशी टीका करुन नका किंवा दहशत पसरवू नका असे म्हणत नव्हते. पण आता एक वाक्य जरी लिहिलं तर तुम्ही असं कसं लिहू शकता म्हणत दहशत माजवली जातेय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी