31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईसंजय राऊतांचे तोंड बंद करण्यासाठी विरोधकांनी 'ईडी'ला केले पुढे

संजय राऊतांचे तोंड बंद करण्यासाठी विरोधकांनी ‘ईडी’ला केले पुढे

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण हे ढवळून निघाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या समर्थनात आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा बंडखोर आमदारांना फैलावर घेत आहेत. सामना वृत्तपत्र, ट्विटर, इतर सोशल मीडिया, सभा आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते वारंवार आमदारांची कान उघडणी करत आहेत. अशातच आता संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

संजय राऊत यांना पत्राचाळ आणि प्रवीण राऊत प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी संजय राऊत यांनी ईडी कार्यालयात दाखल व्हावे, असे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. परंतु ईडीच्या या नोटिसीला संजय राऊत यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या.. मला अटक करा! जय महाराष्ट्र!’

महत्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचे चित्रास सध्या दिसत आहे. संजय राऊत हे बंडखोर आमदारांवर सर्वाधिक निशाणा साधत आहेत. बंडखोर आमदारांबाबतची त्यांची विधाने काही प्रमाणात चिथावणीखोर देखील आहेत. त्यामुळेच की काय पण विरोधकांनी ईडीला पुन्हा एकदा हाताशी धरून संजय राऊतांचे तोंड बंद करण्यासाठी ईडीला पुढे केले असल्याचे देखील बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

राजेंद्र यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक आपापसात भिडले

राज्यपालांनी बहूमतासाठी अधिवेशन बोलवावे ! कॉंग्रेसची मागणी

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी