31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeराजकीयBMC चा प्रभागरचना आराखडा सादर, 236 जागांसाठी प्रभाग सीमा केल्या निश्चित

BMC चा प्रभागरचना आराखडा सादर, 236 जागांसाठी प्रभाग सीमा केल्या निश्चित

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील मुंबई व पुणे महानगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राज्यात सर्वत्र या महापालिका निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं नवीन प्रभागरचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आलाय. तसेच यात 9 वाढीव वार्डची यादीही सादर करण्यात आलीय. मुंबईतील वार्ड संख्या 326 झाल्यानं निवडणुकीतील जागांचे समीकरणही बदलण्याची शक्यता आहे(BMC introduces new ward plan to state election commision).

नोव्हेंबर 2021 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मुंबई नागरी संस्थेची संख्या 227 वरून 236 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या निर्णयानंतर नगरविकास विभागाने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये दुरुस्ती करून महापालिकेच्या रचनेत बदल केला. सन 2011 पासून गेल्या 11 वर्षांच्या काळात मुंबईत नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान 3 वॉर्ड वाढवल्याची माहिती प्राप्त झालीय. त्यानुसार, शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. तर, पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात वॉर्ड वाढवले जाऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिका निवडणूक : प्रभागांच्या राजकारणात निवडणूकांचा बार कधी फुटणार?

मलबार हिल ट्रीटॉप वॉकवेच्या बांधकामासाठी BMC देणार 22 कोटींचे कंत्राट

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार

Mumbai School Reopening Latest News: BMC Issues Guidelines; Makes Mask, Consent Letter Must For Students

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळं त्यावेळीच निवडणूक होणं अपेक्षित आहेत. पण सध्याची कोरोनाची स्थिती आणि तिसरी लाट पाहता निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BMC च्या 227 जागांपैकी शिवसेनेकडे 97 जागा आहेत, तर भारतीय जनता पक्षाला 83, काँग्रेसला 29, राष्ट्रवादी काँग्रेसला 8,समाजवादी पक्ष- 8 जागा, मनसे- 1 जागा, एमआयएम- 1 आणि अभासे-1 जागा मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत वार्ड वाढवण्यात आल्यानं समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेवर कोण आपला झेंडा फडकविणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी