30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजलवकरच खुल्या बाजारात देखील कोवॅक्सिन, कोविशिल्ड लस मिळणार

लवकरच खुल्या बाजारात देखील कोवॅक्सिन, कोविशिल्ड लस मिळणार

टीम लय भारी

नवी दिल्ली : सध्या देशात सर्वत्र कोविड – १९ च्या लसीकरणाला वेग आला आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे(Covaxin, Covishield vaccine will soon be available in the open market).

त्याचप्रमाणे लसीकरणाचा डेटा दर सहा महिन्यांनी DCGI कडे सादर करावा लागतो. CoWIN अॅपवरही डेटा अपडेट करावा लागेल. या दोन्ही लसींची प्रत्येकी किंमत 275 रुपये असणार आहे. तसेच यावर सर्व्हिस चार्ज 150 रुपये इतका लागण्याची शक्यता आहे. कोवॅक्सिनची सध्या खुल्या बाजारात 1200 रुपये किंमत आहे. तर कोविशिल्डचा एक डोस 780 रुपये आहे. दोन्ही लसींवर 150 रुपये सर्व्हिस चार्ज आहे. सध्या देशात दोन्ही डोस आप्तकालीन वापरासाठी उपलब्ध आहे.

DCGI ला पाठवलेल्या अर्जात, हैदराबाद स्थित भारत बायोटेकचे पूर्णवेळ संचालक व्ही कृष्ण मोहन यांनी कोवॅक्सिनसाठी नियमित बाजार अधिकृतता मागताना प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह रसायनशास्त्र, उत्पादन आणि नियंत्रणे यासंबंधी संपूर्ण माहिती सादर केली. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड यांना 3 जानेवारी रोजी आपत्कालीन वापर अधिकृतता (EUA) मंजूर करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

Corona Updates : केंद्राचे घुमजाव! १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस देण्याचा कोणताही कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही

बूस्टर डोससाठी नव्याने नोंदणीची गरज नाही; आरोग्य मंत्रालयाची माहिती

मुंबईत 9 लाख मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर

India joins US, UK to approve market authorisation for COVID vaccines

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्याने आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरातील वितरण व्यवस्था तयार करावी लागेल. परवानगी नंतर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लस रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे.

खुल्या बाजारात विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ज्यांना लस घ्यायची आहे, ते मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊ शकता, अन् डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतात. लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर देशातील लसीकरणाला आणखी वेग येईल. तसेच सरकारवरील भारही कमी होईल. लसीची किंमत ठरल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी