25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeक्रिकेटपुजाराला पुन्हा सूर गवसला !

पुजाराला पुन्हा सूर गवसला !

चितगाव येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपला दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य दिले. .ावेळी भारतासाठी चेतेश्वर पुजारा अन् शुबमन गील या दोघांनीही शतकी खेळी केली.

चितगाव येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपला दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य दिले. .ावेळी भारतासाठी चेतेश्वर पुजारा अन् शुबमन गील या दोघांनीही शतकी खेळी केली. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून आपला फॉर्म चाचपडत असणारा चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा रंगात दिसला आहे. प्रत्युत्तरात बांगलादेशी संघाने तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात दमदार सुरुवात करताना एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या. तरीही बांगलादेश अजूनही 470 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता सध्यातरी सामन्यांतील चौथा दिवस सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ चांगल्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बांगलादेशने तिसऱ्या दिवशीच्या 133/8 च्या पुढे खेळायला सुरुवात केली. येथे शेपटीच्या फलंदाजांनी आणखी 17 धावा जोडल्या आणि संघ 150 धावांवर ऑलआऊट झाला. कुलदीप यादवने 5 आणि मोहम्मद सिराजने 3 बळी घेतले. पहिल्या डावाच्या (404) आधारावर टीम इंडियाला येथे एकूण 254 धावांची आघाडी मिळाली, जरी भारतीय संघाने बांगलादेशला फॉलोऑन होऊ न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल (110) आणि चेतेश्वर पुजारा (102) यांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या डावात 61.4 षटकात 2 गडी गमावून 258 धावा केल्या. या धावसंख्येवर कर्णधार केएल राहुलने भारतीय डाव घोषित केला आणि बांगलादेश संघाला 513 धावांचे लक्ष्य दिले.

हे सुद्धा वाचा

चित्रलेखाने घेतला निरोप; ज्ञानेश महारावांनी लिहिले, राम राम अमुचा घ्यावा!

महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारेचे सरकार; राम कदम यांचा ‘पठाण’वरून इशारा

पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार आहात, तर ही बातमी नक्की वाचा

तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात बांगलादेशला 12 षटके खेळायची होती. यामध्ये त्याने एकही विकेट न गमावता 42 धावा जोडल्या. नजमुल हुसेन शांतो (25) आणि झाकीर हसन (17) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. सध्या टीम इंडियाकडे 470 धावांची आघाडी शिल्लक आहे. म्हणजेच बांगला संघाला विजयासाठी शेवटच्या दोन दिवसांत 471 धावा कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाला येत्या दोन दिवसांत बांगलादेश संघाच्या 10 विकेट्स घ्याव्या लागणार आहेत.

भारतीय संघाचा पहिला डाव: 404 धावा
बांगलादेश पहिला डाव: 150 धावा
भारतीय संघ दुसरा डाव: 258/2 घोषित
बांगलादेश दुसरा डाव: 42/0

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या शर्यतीत राहिल. अन्यथा भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी