27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमहाराष्ट्रऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला; लग्नाच्या मुहूर्ताआधीच घडले आक्रीत

ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला; लग्नाच्या मुहूर्ताआधीच घडले आक्रीत

बदनामी झाल्याचा राग मनात ठेऊन वडिलांनी मुलीची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना ही ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथे बुधवारी ही धक्कादायक घटना घडली.

लग्नाच्या मंडपातून फरफटत नेऊन नवरी मुलीची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. धक्कादायक बाब म्हणजे नवरी मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून मुलीला मंडपातून खेचून नेत तिला घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकावले. त्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचठिकाणी मुलीच्या वडिलांनी आणि काकाने सरण रचून तिचा मृतदेह जाळला आणि नंतर तिच्या मृतदेहाची राख पोत्यांमध्ये भरून ठेवली. माणुसकीला काळिमा फासणारी ऑनर किलिंगची (Honor Killing) ही धक्कादायक घटना जालना तालुक्यात असलेल्या पीर पिंपळगाव गावात घडली. काळीज पिळवटून टाकणारी घडत असताना कोणीही त्या मुलीच्या वडिलांना आणि काकाला थांबवले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सूर्यकला संतोष सरोदे असे मृत झालेल्या मुलीचे नाव असून संतोष भाऊराव सरोदे आणि नामदेव भाऊराव सरोदे अशी संशयित आरोपींची नवे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी सूर्यकला सरोदे हिचे तिच्या चुलत आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. घरचे प्रेमाला विरोध करतील या कारणामुळे ते दोघेही घरातून निघून गेले होते. परंतु दोघांच्याही घरच्यांनी त्यांना आम्ही तुमचे लग्न लावून देतो असे सांगितले. घरच्यांनी विश्वासात घेतल्यानंतर ते दोघेही पुन्हा घरी परतले. यानंतर दोघांनीही आपापल्या घरच्यांना गावातील एका मंदिरात बोलवून घेतले. पण याचवेळी मुलीच्या काकाने बहिणीकडे अर्धा एकर शेतजमीन मुलीच्या नावावर करण्याची मागणी केली. पण यासाठी नकार मिळाल्याने संशयित आरोपी संतोष आणि नामदेव यांना राग अनावर झाला.

मुलीच्या नावे अर्धा एकर शेत जमीन मिळण्यास नकार मिळाल्यानंतर लग्नाच्या दिवशी मयत तरुणी सूर्यकला हिच्या वडिलांनी आणि काकांनी मंदिरात असलेल्या लग्न मंडपातून तिला खेचत घरी नेले. यानंतर घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला तिला लटकवून तिची हत्या करण्यात आली. घरापासून काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणी सरण रचून मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून तिचा मृतदेह जाळला आणि त्याच ठिकाणी तिची राख ही दोन पोत्यांमध्ये भरून ठेवली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याठिकाणी मुलीला जाळण्यात आले, त्याठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार आहात, तर ही बातमी नक्की वाचा

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राने 35 हजार कोटींची केलेली गुंतवणूक कौतुकास्पद !

ममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणाची कागदपत्रे झाली गहाळ

या धक्कादायक घटनेनंतर गावातील अनेक लोक तिच्या घरी आले. परंतु हे सर्व घडत असताना सूर्यकला हिच्या घरचे देखील उपस्थित होते. पण कोणाकडून देखील मुलीच्या वडिलांना का थांबविण्यात आले नाही ? असा प्रश्न सर्व गावकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना चंदनझिरा पोलिसांना स्थानिक खबऱ्यामार्फत मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मयत मुलीच्या वडिलांकडून आणि काकाकडून देण्यात आली. परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मयत मुलीच्या वडिलांनी आणि काकाने गुन्हा कबूल केला. गुरुवारी न्यायालयाकडून या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी