34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा'

‘गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा’

राज्यात अनेक वर्षांपासून मुंबईसारख्या शहरावर अनेक नेत्यांचा डोळा आहे. अशातच आता देशामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार आल्यापसून मुंबईतील अनेक उद्योग, अनेक कंपन्या तसेच डायमंड मार्केट हे गुजरातला वळवण्यात आलं आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची तोफ डागली आहे. ,ज्याप्रकारची न्यायव्यवस्था आहे, ते पाहता राज्यकर्ते मुंबईमध्ये हात घालतील राज्यकर्ते तुकडा पाडतील. आपण अटकेपार झेंडे फडकवले आहेत. मराठा सम्राज्य कुठल्या कुठं गेलं आहे’, असं ते कर्जतच्या मनसेच्या सभेमध्ये बोलत होते.

‘शिवाजी महाराज म्हणाले होते की शत्रू हा समुद्रीमार्गे येऊ शकतो. यासाठी त्यांनी आरमार उभारलं होतं. मात्र आज समुद्रीमार्गातून कसाब आला, आरडीएक्स आणण्यात आलं. आपण महापुरूषांना हार तरी कशाला घालतो. त्यांचं ऐकायचं नसेल तर हारही घालायचा नाही’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

‘आताचे सराकर म्हणजे सहारा चळवळ’ 

‘महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभी राहायला हवी. सहकार चळवळ म्हणजे सरकार चळवळ नव्हे. आताचे सरकार म्हणजे सहारा चळवळ आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी सावकरांच्या घश्यात जावू नये म्हणून महात्मा ज्योतीबा फुले यांनी सहकार चळवळ सुरू केली आहे. सहकार चळवळीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर गुजरातचा क्रमांक आहे. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे’, असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा

डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटला राम राम

‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’

२२ जानेवारीला आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे घेणार दर्शन

‘सध्या आपण जातीत भांडत आहोत. हे चालू नाही तर हे चालवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये जे चांगलं आहे ते बाहेर काढा जे बाहेर येत नाही ते उद्धवस्त करा. हे सर्व बाहेरच्या लोकांची धारणा आहे’, असा दावा आता राज ठाकरे यांनी कर्जतच्या सभेमध्ये केला आहे.

;

‘आपल्याविरोधात सहकार चळवळ सुरू आहे. आपल्या जमिनी, प्रकल्प हिसकवले जातात आणि बाहेरच्या राज्यातील लोकं जमिनी विकत घेतात. मराठी लोकांना आपापल्यामध्ये झुंजवलं जात आहे. आपले लोकं मिंधे झालेले आहेत. एकाच्या पाठीला मणका नाही’, असं बोलत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी