28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटमुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याचंं कमबॅक; गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याचंं कमबॅक; गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल

आयपीएल सुरू होण्यापूर्वी आयपीएलची (IPL) चर्चा होत आहे. कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार आहे, यावर अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयसीसी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली मात्र अंतिम सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र आता देशाच्या नजरा आयपीएलकडे लागल्या असून गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सच्या (Gujarat titans) आयपीएल संघातून मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती मात्र आता यावर अधिकृत माहिती दिली गेली आहे. (Shubman Gill)

टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने वर्ल्डकपमधून त्याला बाहेर पडावे लागले. मात्र आता तो पुन्हा एकदा २०२४ च्या आयपीएल सामन्यात दिसणार आहे. गुजरात टायटन्सच्या कर्णधार पदाचा दवेदार असणारा पांड्या पुन्हा एकदा आपल्या माजी फ्रेंचायजी मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक करणार आहे. ही माहीती अधिकृतपणे आयपीएलच्या ट्विटर हॅंडलद्वारे दिली आहे. यावेळी गुजरात टायटन्सनचा नवीन कर्णधार हा शुभमन गिल असणार आहे, अशी माहिती देखील ट्विट करत दिली.

हे ही वाचा

‘छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले’

‘छगन भुजबळ यांची गाडी फोडणार’; स्वराज्य संघटनेचा इशारा

जालना औद्योगिक वसाहत केंद्रात जीएसटी पथकाची धाड

गुजरातचा नवा कर्णधार शुभमन गिल

आयपीएलचा सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेड काही दिवसांपासून सुरू होता. त्यावर एकदाचा पुर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पांड्या आता मुंबईत गेल्याने गुजरात टायटन्स संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल अशी चर्चा होती. यावर सोमवारी शुभमन गिल गुजरात संघाच्या कर्णधार पदाची धुरा संभाळणार असून सीनिअर क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे, हे अंतिम सत्य आता बाहेर आले आहे.

मुंबई इंडियन्सने ‘या’ खेळाडूंना सोडलं

रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये ट्रेड केलं असं सांगितलं जात आहे. मुंबईने जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, झ्ये रिचर्डसन, रमणदीप सिंग, राघव गोयल, अर्शद खान आणि हृतिक शोकीन यांना सोडलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी