30 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
Homeक्रिकेटहार्दिक पांड्याला १५ कोटींऐवजी मिळाले तब्बल 'एवढे' कोटी?

हार्दिक पांड्याला १५ कोटींऐवजी मिळाले तब्बल ‘एवढे’ कोटी?

आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम सुरू होण्याआधी आगामी आयपीएल रंगात आली आहे. याची चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे. काही दिवसांआधी खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला 24 कोटी रुपये मोजत घेतलं. यामुळे आता आगामी आयपीएल अगदीच महत्वाचा असणार आहे. दरम्यान काही दिवसांआधी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबईमध्ये आला आणि रोहित शर्माचं कर्णधारपद गेलं. यामुळे रोहितचे चाहते चांगलेच भडकले. एवढंच नाही तर मिलियनभर फोलॉवर्सने मुंबई इंडियन्स (MUMBAI INDIANS) संघाच्या फ्रेंचायजी इंस्टाग्राम अकाउंटला अनफॉलो केलं.

हार्दिक पांड्याने मुंबई संघाच्या संघमालक यांना कर्णधारपदाची मागणी केली होती असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. यामुळे हार्दिक पांड्याला मुंबईने ट्रेड केलं होतं. हार्दिकला 15 कोटी रुपये दिले होते अशी माहिती आतापर्यंत माध्यमांनी दिली आहे. त्यापैकी 7.50 कोटी गुजरात संघाला दिले आहेत. आणि उर्वरित रक्कम हार्दिकला दिली असल्याची माहिती समोर आली. मात्र आता खरी किंमत किती रुपये मोजली आहे. याबाबत माहिती समोर आली. (100 crore)

हे ही वाचा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माचं ‘या’ खेळाडूंबाबत भाकीत

अजित पवारांच्या चॅलेंजला अमोल कोल्हेंचा पलटवार

सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर येणार चित्रपट? निर्मात्याने दिली माहिती

हार्दिकसाठी मोजली एवढी किंमत

इंडियन्स एक्सप्रेसच्या वृत्तानुसार हार्दिक पांड्याला 15 नाहीतर तब्बल 100 कोटी रुपये दिले असल्याचं सांगितलं जातं आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या संघमालकांच्या खिशाला कात्री बसली आहे. अशातच याउलट हार्दिकला ट्रेडडीलमुळे 15 कोटींची वाढ झाली आहे.

हार्दिक पांड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये 52 विकेट्स घेतल्या असून 2309 धावा केल्या आहेत. अशातच 2022 वर्षांमध्ये हार्दिकने गुजरात टायटन्स या संघामध्ये चांगली कामगिरी करत आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. हार्दिकला आता मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून संधी दिली आहे. मात्र सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी