28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअमोल कोल्हेंना लख लाभ, मी काल सांगितलेलं माझं फायनल; अजित पवारांचा हल्ला...

अमोल कोल्हेंना लख लाभ, मी काल सांगितलेलं माझं फायनल; अजित पवारांचा हल्ला बोल

राज्यात आगामी लोकसभेच्या निवडणुकांवर आरोपप्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने आता एका पक्षातील दोन गट आमनेसामने भिडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असं पहिल्यांदा घडलं आहे. हे राज्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये कधी पाहायला मिळालं नाही ते आता पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल अमोल कोल्हेंच्या (Amol kolhe) विरोधात उमेदवार उभा करणार आणि पाडणार असं खुलं आव्हान दिलं आहे. यानंतर ते आता अमोल कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये जाऊन कामाची पाहणी करत आहे. याबाबत पुन्हा एकदा अजित पवार यांनी मी ठरवलं की फायनल म्हणत अमोल कोल्हे यांना टार्गेट केलं आहे.

अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील मांजरी या ठिकाणी जाऊन अजित पवार यांनी पाहणी केली आहे. आतापर्यंत कोल्हे यांनी काय काम केलं या कामाचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. मात्र काल दिलेल्या चॅलेंजचा कोणताही एक हेतू नसल्याचं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. अजित पवार यांनी काल अमोल कोल्हेंना पाडणार असल्याचं आव्हान केलं आणि आता मात्र ते मांजरीमध्ये जात पाहणी करत आहेत. यामुळे आता राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता अमोल कोल्हेंच्याविरोधामध्ये अजित पवार कोणाला संधी देणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा

हार्दिक पांड्याला १५ कोटींऐवजी मिळाले तब्बल ‘एवढे’ कोटी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माचं ‘या’ खेळाडूंबाबत भाकीत

अजित पवारांच्या चॅलेंजला अमोल कोल्हेंचा पलटवार

अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना निवडून देणार नाही असं ओपन चॅलेंज दिलं आहे. यावर अमोल कोल्हे यांनी अजित दादांवर पलटवार करत चॅलेंज स्विकारणार असल्याचा दावा केला आहे. अजित दादा मोठे नेते आहेत. त्याचं आव्हान स्विकारण्याएवढा मी मोठा नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्या निर्णयाने जर मला शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी संधी दिल्यास मी निवडणूक लढवायला तयार असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. यावर आता अजित पवारांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

अजित पवारांचा पटलवार

‘कालच्या कार्यक्रमाचा आणि शिरूरमधील कार्यक्रमाचा कोणताही एक संबंध नाही. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लख लाभ! मी काल सांगितलं ते माझं फायनल’, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या मतावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अमोल कोल्हेंविरोधात कोण?

अमोल कोल्हेंविरोधामध्ये अजित पवार कोणाला निवडणुकीसाठी उभं करणार? असा राजकीय वर्तुळामध्ये प्रश्न पडला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं लांडे यांनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी