22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माचं 'या' खेळाडूंबाबत भाकीत

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माचं ‘या’ खेळाडूंबाबत भाकीत

वनडे विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियानं चांगलं प्रदर्शन केल्यानंतर शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच आता संघाचा कर्णधार रोहित शर्माने याच पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबासह काही दिवस वेळ घालवला आहे. यानंतर आता रोहित शर्मा (Rohit Shrama) पुन्हा एकादा मैदानावर दिसणार आहे. आगामी इंडिया विरूद्ध द.आफ्रिका (India Vs South Africa) संघामध्ये कसोटी मालिका द. आफ्रिकेमध्ये होणार असून याबाबत इंडियातील गोलंदाज आणि फलंदाजांबाबत त्यानं भाकीत केलं आहे. यामध्ये के.एल. राहुल, मुकेश आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं त्याने कौतुक केलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

माध्यमांशी बोलत असताना, रोहित शर्माने सुरूवातील द. आफ्रिकेमधील मैदानाबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, ‘द.आफ्रिकेच्या मैदानावर कसोटी सामन्यामध्ये फार कमी वेळा जिंकलो आहे. यामुळे कसोटी मालिका आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे. याठिकाणी सर्वाधिक गोलंदाजीसाठी चांगलं वातावरण आहे. यासाठी द.आफ्रिकेमध्ये वेगवान गोलंदाजांप्रमाणे धीम्या गतीचे गोलंदाजही प्रभावी पडताना दिसत आहेत. मात्र फलंदाजीसाठी थोडं आव्हान असल्याचं रोहित शर्माने भाकीत केलं आहे.

हे ही वाचा

अजित पवारांच्या चॅलेंजला अमोल कोल्हेंचा पलटवार

सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर येणार चित्रपट? निर्मात्याने दिली माहिती

अमोल कोल्हेंविरोधात उमेद्वार निवडून दाखवील; अजित पवारांचं ओपन चॅलेंज

के. एल. राहुलच्या यष्टीरक्षणावर काय म्हणाला रोहित शर्मा?

के.एल राहुल एक चांगला यष्टीरक्षक आहे. त्याने वनडे विश्वचषकामध्ये केलेलं यष्टीरक्षण वाखडण्याजोगं होतं. त्याने वास्तवामध्ये खूप मेहनत घेतली आहे. एवढंच नाही तर तो एक उत्कृष्ट फलंदाजही आहे. तो फलंदाजीसाठी मीडल ऑर्डरसाठी खेळण्यास येतो. त्यावेळी त्या परिस्थितीला कसं सांभाळता येईल आणि कशा पद्धतीने खेळायला हवं हे त्याला चांगलं माहित आहे. एक मात्र आहे की, त्याचं यष्टीरक्षणही चांगलं आहे. मात्र तो खेळ किती कालावधीपर्यंत टिकवून ठेवेल हे मला सांगता येणार नाही. यानंतर रोहितने मुकेश आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं त्याने कौतुक केलं.

मुकेश की प्रसिद्ध कृष्णा कोणाला मिळणार संधी?

रोहित शर्माला माध्यमांनी मुकेश की प्रसिद्ध कृष्णा कोणाला संधी देण्यात येणार आहे? असं विचारलं असता, तो म्हणाला की, हे आम्ही सामन्याआधी ठरवू. त्यावेळी कशी परिस्थिती असेल तसेच खेळपट्टी कशी आहे, हे सर्व पाहूण आम्ही पाऊल उचलणार आहोत. मुकेश हा चांगला गोलंदाज असून त्याने चांगली गोलंदाजी केली असल्याचं रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी