31 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
Homeक्रिकेटभारत-पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार 'या' दिवशी; तारीख आली समोर

भारत-पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार ‘या’ दिवशी; तारीख आली समोर

देशात नुकताच काही महिन्यांपूर्वी वनडे विश्वचषक पार पडाला आहे. यामध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया संघाने पराभूत केलं आहे. या विश्वचषकामध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला होता. मात्र काही कारणांमुळे हातचा विश्वचषक टीम इंडियाला घालवावा लागला आहे. मात्र आता अशातच आगामी टी 20 विश्वचषक २०२४ मध्ये होणार आहे. यामुळे आता टीम इंडिया कसून सराव करत आहे. अशातच आता भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये आगामी टी20 विश्वचषक (T20 Worldcup) सामना होणार असून याची तारीख समोर आली आहे. अनेकदा टीम इंडियाच्या चाहत्यांना विश्वचषक जिंकता आला नाही तरीही चालेल मात्र पाकिस्तान संघाला हरवण्याबाबत भारतवासीयांच्या टीम इंडियाकडून अपेक्षा असतात.

इंडिया आणि पाकिस्तान टी 20 विश्वचषक सामना तारीख आली समोर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा दोन्ही देशांसाठी एक अस्तित्वाची लढाई असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांनी आपल्या देशाला परस्परविरोधी खेळताना पाहिल्याने दोन्ही देशांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला आहे. अशातच आता आगामी टी 20 विश्वचषकातील इंडिया आणि पाकिस्तानचा सामना हा ८ किंवा ९ जून रोजी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून हा सामना आता न्यूयॉर्कमध्ये होणार असल्याच्या चर्चा आहेत. यावेळी पाकिस्तान आणि इंडियामधून असंख्य क्रिकेट चाहते ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी जाणार आहेत.

हे ही वाचा

धनुष्यबाणाच्या चिन्हावर भाजपसोबत शिंदे गट निवडणूक लढवणार; अमित शाहांसोबत बातचीत

कोरोना जे एन 1 नव्या व्हेरियंटचा शिरकाव; देशात सावधानता

मुंबईमध्ये जमावबंदी लागू; कलम १४४ ची घोषणा

इंडिया आणि पाकिस्तान वर्षभरात तीनदा आमने सामने

इंडिया आणि पाकिस्तानमध्ये यंदाच्या वर्षी एकूण ३ सामने खेळवण्यात आले होते. यामध्ये इंडियाने पाकिस्तानचा पराभूत केला आहे. दोन सामने हे आशिया कपमध्ये खेळवण्यात आले असून एक विश्वचषकामध्ये सामना खेळवण्यात आला. विश्वचषकामध्ये पाकिस्तानला टीम इंडियाने आसमान दाखवलं होतं. तर आशिया कपध्ये दोन सामने झाले त्यापैकी एक समाना हा पावसामुळे रद्द झाला. तर इतर दोन्ही सामन्यांमध्ये इंडियाने विजय मिळवला होता.

इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अनेक वर्षांपासून कोणतीही मालिका झाली नाही. या दोन्ही देशांचे राजकीय संबंध हे चांगले नाहीत. यामुळे हे दोन्ही संघ परस्परविरोधी आशिया कप आणि वनडे विश्वचषकामध्ये खेळले आहेत. आता २०२४ मध्ये ८ किंवा ९ तारखेला जून महिन्यात न्यूयॉर्कमध्ये परस्परविरोधी खेळणार असल्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी