27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडासाक्षी मलिकची कुस्ती क्षेत्रातून राजीनाम्याची घोषणा

साक्षी मलिकची कुस्ती क्षेत्रातून राजीनाम्याची घोषणा

भारताच्या क्रिडाविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताला ऑलिंपिक जिंकूण देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने (sakshi malik) कुस्ती क्षेत्रातून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. साक्षी मलिकने असा अचानक निर्णय का घेतला असावा असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आता माहिती समोर आली आहे. नुकतेच आता (WFI) बृजभूषणचे निकटवर्तीय हे कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष झाले आहेत. साक्षी मलिकने बृजभूषणच्या (Brijbhushan) निकटवर्तीयांच्या अध्यक्षतेखाली कुस्ती खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. यामुळे आता साक्षी मलिकने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आता समोर येत आहे. यामुळे आता कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Wrestling)

भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहिर केली आहे. कुस्ती संघटनेची निवडणूक गुरुवारी पार पडली आहे. बृजभूषणचे निकटवर्तीय संजय सिंह हे नवीन अध्यक्ष झाले आहेत. यावर्षी मल्लांनी बृजभूषण यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे. दिल्लीमध्ये जंतरमंतर आंदोलन केलं आहे. बृजभूषणचा विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये साक्षी मलिकने सहभाग घेतला होता.

हे ही वाचा

भारत-पाकिस्तान टी 20 वर्ल्डकपचा सामना होणार ‘या’ दिवशी; तारीख आली समोर

धनुष्यबाणाच्या चिन्हावर भाजपसोबत शिंदे गट निवडणूक लढवणार; अमित शाहांसोबत बातचीत

मुंबईमध्ये जमावबंदी लागू; कलम १४४ ची घोषणा

३१ वर्षाय साक्षीने दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो असून देशातील अनेक लोकं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. बृजभूषण यांचे निकटवर्तीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष झाल्याने मी कुस्तीतून निवृत्त होत असल्याचं साक्षी मलिक म्हणाल्या आहेत. आम्ही मनापासून लढलो आहे. जर बृजभूषण यांचा माणूस जर कुस्ती संघाचा अध्यक्ष होत असेल तर मी कुस्तीचा त्याग करते, असे साक्षी मलिक म्हणाल्या आहेत.

बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी कुस्ती संघटनेच्या निवडणुकीमध्ये एकहाती विजय मिळवला आहे. याआधी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हे बृजभूषण होते. त्याचप्रमाणे आता त्याचे निकटवर्तीय संजय सिंह हे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष झाले आहेत. यामुळे साक्षी मलिक यांनी हा घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी