27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयधनुष्यबाणाच्या चिन्हावर भाजपसोबत शिंदे गट निवडणूक लढवणार; अमित शाहांसोबत बातचीत

धनुष्यबाणाच्या चिन्हावर भाजपसोबत शिंदे गट निवडणूक लढवणार; अमित शाहांसोबत बातचीत

राज्यात आता आगामी निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू-तू आणि में में परिस्थिती पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. भाजपासोबत आता शिवसेना शिंदे गट निवडणूक लढवणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत. यासाठी कमळ नाही तर धनुष्यबाण चिन्हाचा वापर करतच निवडणूक लढवता येणार असलयाचं संजय शिरसाट यांनी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलेल्या टोल्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर त्यांनी आपला पक्ष संपत चालला असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

भाजप कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं आरएसएसच्या बैठकीमध्ये ठरलं होत. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी यावर स्पष्टोक्ती दिली आहे. भाजपसोबत धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिंदे गट निवडणूक लढवणार असलयाचं भाजपचे मंत्री अमित शाहांशी बोलणं झालं असल्याचं शिरसाट बोलले आहेत.

पक्ष संपतोय लक्ष द्या – संजय शिरसाट

राजकारणात भविष्य सांगणारे अनेक आहेत. तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली असल्याने आपण आम्हाला शिकवू नका. तुम्हाला आतले मुद्दे देखील कळाले असतील तर तुमचं कठीण आहे. तुम्ही नुसतं कान लावू नका. तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे. त्यामुळे आता तुम्ही त्याकडे आधी लक्ष द्या असे शिरसाट म्हणाले आहेत.

हे ही वाचा 

कोरोना जे एन 1 नव्या व्हेरियंटचा शिरकाव; देशात सावधानता

‘अजित दादांचा बिनडोकांच्या नादाला लागून कर्जत एमआयडीसीचा (MIDC) निर्णय’

मुंबईमध्ये जमावबंदी लागू; कलम १४४ ची घोषणा

आम्हाला पात्र आणि अपात्रतेबाबत चिंता नाही कारण आम्हाला याआधी चिन्ह दिलं आहे. आणि पक्ष ही आमचाच आहे. आपल्या सुनावणीत आम्ही सर्व पुरावे दिले असल्याने १० जानेवारीला निर्णय आमच्याच बाजूने लागणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचं खाणं काढलं

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना देखील सोडलं नाही. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात आले  खायचं आणि चहा, नाश्ता करायचा एवढंच जमलं. त्यापेक्षा आणखी काही बोलले असते तर बरं झालं असतं. त्यामुळे दर्शनामुळे आले आणि गेले असं संजय शिरसाट यांनी टीका केली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी