28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयडॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांना पुन्हा झोडपले

डॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांना पुन्हा झोडपले

काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करणार आणि निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हान दिलं आहे. यानंतर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवार कामाच्या पाहणीसाठी गेले यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आता एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. याच आव्हानाला अमोल कोल्हेंनी अजित पवार यांना आव्हान केलं आहे आणि बारामतीतील शेतकऱ्यांचा अजितदादांना विसर पडला की काय? असा मिश्किल सवाल करत टोला लगावला आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

एबीपी माझाशी बोलत असताना, अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजवर भाष्य केलं आहे. यावर आता मी ही अजित दादांना आव्हान करतो की जे सरकारला करता आलं नाही तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मिटवता आल्या नाही यावर जरा लक्ष द्या असं मी आव्हान करतो असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील शेतकऱ्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते सत्तेमध्ये गेले आणि मंत्री झाल्यावर त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी केली आहे. मात्र यावर अजितदादांना शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याचा अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा

स्मृती मानधनाला हवा आहे ‘असा’ मुलगा; बीग बी अमिताभ बच्चनसमोर दिली स्पष्टोक्ती

शिखर धवनमधील बाप तळमळला

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला होणार रवाना

‘शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम सुरू’

२४१० रूपयांचा कांद्याला दर देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम सुरू असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की सरकार शेतकऱ्यांचं आहे, मग दिल्लीवारी करताना सत्ता संघर्ष याबाबतच चर्चा करता का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.

‘मोर्चा संपताच अजितदादांची भेट घेणार’

अर्थ खाते अजित दादांकडे असल्याने कांद्याच्या निर्यात धोरणाबाबत मोठा निर्णय घ्यावा. दुधाच्या उत्पन्नाबाबतचा प्रश्न त्यांनी सोडवायला हवा. मी मोर्चा संपल्यानंतर निश्चितच अजित दादांची भेट घेणार आणि शेतकऱ्यांबाबत प्रश्न विचारणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी