23 C
Mumbai
Friday, February 23, 2024
Homeक्रीडाशिखर धवनमधील बाप तळमळला

शिखर धवनमधील बाप तळमळला

टीम इंडिया संघामधून शिखर धवन बाहेर आहे. काही महिन्यांपसून त्याच्या आयुष्यामध्ये वादळांसारखं कौटुंबिक समस्या उद्भवू लागल्या आहेत. तो त्या समस्यांना तोंड देत आपलं जीवन जगत आहे. काही दिवसांआधी म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये शिखर धवनची पत्नी आयशा आणि शिखर धवन यांचा घटस्फोट झाला आहे. अशातच शिखर धवनचा मुलगा जोरावर आता त्याच्या आईकडे म्हणजेच आयशाकडे आहे. (२६ डिसेंबर) दिवशी शिखर धवनच्या मुलगा जोरावरचा वाढदिवस होता. यावेळी त्याने आपल्या मुलाला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत असताना त्याने हळहळ व्यक्त केली असून धवनमधील बाप तळमळला आहे.

शिखर धवनने आपल्या मुलाला पाहून एक वर्षे झाले असावेत तरीही अजूनही त्याला आपल्या मुलाला भेटता आले नाही. काही दिवसांआधी शिखर धवनचा आणि पत्नी आयशा मुखर्जीचा घटस्फोट झाला आहे. धवनच्या मुलाचा २६ डिसेंबर दिवशी वाढदिवस झाल्याने धवनला आपल्या मुलापर्यंत पोहोचता आले नाही. त्याला सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्यात आलं आहे. यामुळे त्याने आपल्या मुलाला भावनिक पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आता नेटकरी भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला होणार रवाना

सल्लू भाई का बड्डे; चाहत्यांना देणार ‘असं’ काही गिफ्ट

‘भीमा कोरेगाव कार्यक्रम सरकारच्या निधीतून पार पडावा’

आपल्या मुलाला धवनने  वर्षभर पाहिलं नाही. त्या दोघांची भेटही झाली नाही. आपल्या मुलाच्या वाढदिवशी मनातील सल त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलाला शुभेच्छा देत बोलून दाखवली आहे. यावेळी त्याने आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याने आपलाही फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला शिखर धवन?

माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जरी मी थेट कनेक्ट होऊ शकत नसलो तरी, मी नेहमीच तुझ्यापाशी मनातून संवाद जोडलेला असतो. मला तुझा खूप अभिमान आहे, आणि मला माहित आहे की तुझं खूप चांगलं चाललं असून तु आता मोठा होत आहेस. तुझे बाबा तुझी नेहमीच तुझी आठवण काढतात आणि तुझ्यावर खूप प्रेम करतात. बाबा नेहमी सकारात्मक राहतो आणि देवाच्या कृपेनं भेटीच्या दिवसाची वाट पाहत आहे. खोडकर हो, मात्र विचलित होऊ नकोस. इतरांना मदत कर, नम्र हो, दयाळू हो, धीर धरायला शिक आणि मजबूत रहा. तुला भेटण्यास शक्य नसतानाही, मी जवळजवळ दररोज तुला मेसेज पाठवतो. मला तुझ्या चांगलं असण्याबद्दल आणि दैनंदिन जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा काय घडत आहे ते तुझ्यासोबत शेअर करायचे आहे. तुला खूप खूप प्रेम, असं म्हणत शिखर धवनने आपल्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी