स्मृती मानधना ही महिला टीम इंडिया संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. तिनं आपल्या खेळाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. एक क्रिकेटर म्हणूनच नाही तर आपल्या सौंदर्याने टीम इंडियाच्या महिला खेळाडूंमध्ये क्रश म्हणून अनेक तरूणांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिस्तप्रिय खेळाडू आणि महिला आयपीएल बंगळूर संघाची कर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandana) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. केबीसी (KBC) या कार्यक्रमामध्ये स्मृती आणि टीम इंडियाचा फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) गेले असताना यावेळी एका प्रेक्षकाने स्मृतीला आपल्याला आवडणाऱ्या मुलामध्ये कोणते गुण असावेत? असा प्रश्न केला असताना सर्विकडे हशा पिकला. (amitabh bacchan)
प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाने खेळाचा रंग बदलला. यावेळी कोणताही प्रेक्षक अशा स्वरूपाचा प्रश्न विचारेल असं वाटलं नसल्याचं स्मृतीनं सांगितलं आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारलेल्या प्रेक्षकाला विचारलं की आपलं लग्न झालं आहे का? यावर प्रेक्षक म्हणाला नाही झालं म्हणून तर विचारलं आहे. यावर इशान किशननेही स्मृतीला हळूच मिश्किल टोला लगावला आहे. प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती उत्तरली आहे.
हे ही वाचा
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला होणार रवाना
सल्लू भाई का बड्डे; चाहत्यांना देणार ‘असं’ काही गिफ्ट
काय म्हणाली स्मृती?
अशा प्रश्नांची मला अपेक्षा नव्हती असं स्मृती लाजत म्हणाली. माझी काळजी घेणारा आणि माझा खेळ समजून घेणारा मुलगा हवा आहे. हे दोन मुख्य गुण त्याच्याकडे असावेत. माझा खेळ पाहता मी त्याला फरसा वेळ देऊ शकत नाही. ही बाब त्याने समजून घ्यावी. त्याने स्वत:ची काळजी घ्यावी आणि समजून घ्यावं या गोष्टींंना प्राधान्य द्यायला हवं असं म्हणत स्मृतीनं आपल्या आवडत्या मुलामधील गुणांबाबत स्पष्टोक्ती दिली आहे.
स्मृतीनं ८० वनडे, ६ कसोटी, १२५ टी २० सामने खेळले आहेत. सर्व फॉरमॅटमधील धावा मिळून स्मृतीच्या तब्बल ६ हजार धावा झाल्या आहेत. महिला कसोटी सामन्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात पहिला सामना जिंकण्यास स्मृतीच्या खेळाने मदत झाली आहे. दरम्यान आगामी ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकांमध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वासाठी हरमनप्रीत कौैर आणि उपकर्णधार म्हणून स्मृती असणार असल्याचं सांगितलं आहे.