27 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे लोकसभेतून निलंबित

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे लोकसभेतून निलंबित

एका बाजूला नागपूरध्ये हिवाळी अधिवेशन (Weather session) सुरू आहे. तर दिल्ली येथे संसदेमध्ये लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काही विरोधी खासदारांंचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांचं हिवाळी अधिवेशनातून निलंबन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठ्ठा धक्का बसला आहे. यांच्यासोबतही काही इतर खासदारांचाही समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही निलंबित केलं आहे. या तीन खासदरांसह इतर पक्षातील खासदारांना निलंबित केलं

राष्ट्रवादीच्या तीन खासदारांसोबतच आता इतर विरोधी पक्षातील काही खासदारांना निलंबित केलं. मावा रॉय, किर्ती चितंबरम, एसटी हसन, डिंपल यादव यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबित करण्यामागचं ठोस कारण आता समोर आलं आलं आहे.

हे ही वाचा

राम मंदिराच्या उद्घाटनाला आडवाणींना न येण्याची विनंती; तर ‘हे’ बॉलिवूड कलाकार लावणार उपस्थिती

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार चैन की निंद; शाळेच्या वेळेत होणार बदल

‘चमचे का वाजताहेत’; धारावी मोर्च्यावरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार

काय आहे निलंबित असण्याचं कारण?

काही दिवसांआधी दोन तरूणांनी संसदेमध्ये संसदेच्या गॅलरीतून थेट हल्ला केला. यावेळी त्यांनी धुरांच्या पिवळ्या रंगाच्या नळकांड्या उडवल्या आहेत. याचा त्रास हा संसदेमधील खासदारांना झाला आहे. यामुळे आता खासदारांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला असता, त्याचप्रमाणे घडलेल्या प्रकरणी चौकशी केली जावी यासाठी आवाज उठवला आहे. यामुळे आता विरोधी खासदारांना मागील दोन दिवसांपासून लोकसभा हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात येत आहे.

आज निलंबित करण्यात आलेले खासदार

१.दुलाल चंद्र गोस्वामी २. रवनीत सिंग बिट्टू ३. दिनेश यादव ४. के सुधाकरन ५. मोहम्मद सादिक ६. एमके. विष्णुप्रसाद ८. पीपी मोहम्मद फैजल ९. सजदा अहमद १०. जसवीर सिंग गिल ११. महाबली सिंग १२. अमोल कोल्हे १३. सुशील कुमार रिंकू १४. सुनील कुमार सिंग १५. एसडी हसन १६. एम. दनुषकुमार १७. प्रतिभा सिंह १८. थोल थिरुमलवन १९. चंद्रेश्वर प्रसाद २०. आलोक कुमार सुमन २१. दिलीश्‍वर कामैत २२. व्ही. वैथिलिंगम २३. गुरजीत सिंग औंजला २४. सुप्रोया सुले २५. एसएस.पलानिमनिकम २६. अदूर प्रकाश २७. अब्दुल समद २८. मनीष तिवारी २९. प्रद्युत बोर्डोलोई ३०. गिरधारी यादव ३१. गीता कोरा ३२. फ्रान्सिस्को सारादिना ३३. एस. जगतरक्षक ३४. एस.आर. पार्थिवन ३५. फारुख अब्दुल्ला ३६. ज्योत्सना महंत ३७. A. गणेशमूर्ती ३८. माला रॉय ३९. पी. वेलुसामी ४०. ए.चेल्लाकुमार ४१. शशी थरूर ४२. कार्ती चिदंबरम ४३. सुदीप बंदोपाध्याय ४४. डिंपल यादव ४५. हसनानीन मसूदी ४६. डॅनिश अली ४७. खलीलुर रहमान ४८. राजीव रंजन सिंह ४९. DNV. सेंथिल कुमार ५०. संतोष कुमार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी