22 C
Mumbai
Sunday, February 25, 2024
Homeराजकीय'आईच्या मुलाला कुणबी जातप्रमाणपत्र द्या'

‘आईच्या मुलाला कुणबी जातप्रमाणपत्र द्या’

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा बांधव आंदोलन आणि उपोषण करत आहेत. मात्र अजूनही यावर कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्याची अंतिम तारीख सांगितली. मात्र अजूनही यावर कोणतंही ठोस पाऊल उचलायला सरकार तयार नाही. केवळ अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा आहेत. येत्या २४ डिसेंबरपर्यंत सरकारनं निर्णय घ्यावा नाहीतर आम्हाला पुढची दिशा ठरवावी लागेल. पुढची दिशा ठरवली तर मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेतली होती मात्र ते आपल्या निर्णयाशी ठाम आहेत.

मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शिष्टमंडळाने मनोज जरांगेंना वेळ आणखी  वाढवून मागितला होता. मात्र आता यावर मनोज जरांगेंनी कोणाचंही ऐकलं नसून ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारला वेळ वाढवून देणार नाहीत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. अशी मागणी मराठा समाजाची आहे. अशातच त्यांच्या मागणीत अजून एका मागणीची वाढ झाली आहे. एखाद्या महिलेकडे कुणबी जातप्रमाणपत्र असेल तर त्या आईच्या मुलाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं असं जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा 

मिचेल स्टार्क आयपीएल लिलावात एकच नंबर; पॅट कमिन्सलाही टाकलं मागे

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे लोकसभेतून निलंबित

राम मंदिराच्या उद्घाटनाला आडवाणींना न येण्याची विनंती; तर ‘हे’ बॉलिवूड कलाकार लावणार उपस्थिती

मराठवाड्यात नोंदी कमी

राज्यभरात कुणबी प्रमाणत्राच्या नोंदी सापडत आहेत. मात्र मराठवाडा येथे कुणबी प्रमाणपत्र सापडत नसल्याच्या चर्चा आहेत. यामागेही काही कारणं आहेत. मनोज जरांगेंच्या मते, इथले काही अधिकारी पुरावे शोधत नसून निरर्थक अहवाल तयार करत आहेत. त्यांचा एकदाचा बंदोबस्त करा. समितीला २४ डिसेंबरपर्यंत काम करू द्या येत्या काही दिवसांत लाखभर प्रमाणपत्र सापडतील, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आरक्षण देण्यासाठी प्रॉब्लेम काय?

समितीने शोधलेल्या दस्तऐवजामध्ये शेती लिहिलं होतं? शेती म्हणजे कुणबी. पूर्वी राजस्थानचे भाट होते. त्यांच्या नोंदी तपासल्या गेल्या. यामुळे कुणबी प्रमाणत्र दिलं जाऊ शकतं. मराठवाड्याचे विदर्भाशी तर विदर्भाचे पश्चिम महाराष्ट्राशी नाते असल्याने मुली महाराष्ट्रात दिल्या (विवाह) जातात. मराठवाड्यात केल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रातही केल्या जातात. तिथे तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मात्र रोटी-बेटी व्यवहार होऊन मराठवाड्यात येते. त्यावेळेस तिच्याच लेकराला तिच्याकडे असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. ते देण्यासाठी काय प्रोब्लेम आहे? असा सवाल आता जरांगेंनी केला

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी