28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार चैन की निंद; शाळेच्या वेळेत होणार बदल

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार चैन की निंद; शाळेच्या वेळेत होणार बदल

राज्यात अनेक वर्षांपासून प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा ही सकाळी असते. तर माध्यमिक विद्यार्थ्यांची शाळा ही दुपारी असते. प्राथमिक विद्यार्थी हे सकाळी ७ वाजता शाळेत जाताना दिसतात. तर माध्यमिक वर्गातील विद्यार्थी दुपारी १२ वाजता शाळेत जाताना दिसतात. प्राथमिक वर्गातील मुलं ही साधारणता सकाळी शाळेत जात असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे आता प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल होणार असल्याचा निर्णय आता राज्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais) यांना ही सूचना केली होती. प्राथमिक वर्गातील लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने हा निर्णय घेण्यात यावा, असे केसरकर (deepak kesarkar) विधिमंडळात बोलत होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक वर्गातील म्हणजेच इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ नंतर भरवण्यात येईल. अशी घोषणा शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचं वय हे ३ ते १० वर्षे असतं तर माध्यमिक विद्यार्थ्यांचं वय हे १२ वर्षांच्या पुढं असतं. यामुळे प्राथमिक शाळा या दुपारी आणि माध्यमिक शाळा सकाळी सुरू करण्यात येणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांनीच सूचना केली की, दुसरीपर्यंत प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे. मात्र इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समिती तयार करण्यात येणार असल्याचं केसरकर म्हणाले आहेत. यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा

‘खडसेंच्या डोक्यात बिघाड झालाय का’?

‘चमचे का वाजताहेत’; धारावी मोर्च्यावरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार

दाऊद इब्राहिमला झाली विषबाधा? पाकिस्तानातील इंटरनेटसेवा बंद; काहीतरी गौडबंगाल?

विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने शालेच्या वेळेत बदल

लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांच्या शाळेच्या वेळेत बदल करावा ही सूचना राज्यपालांनी शिक्षण मंत्र्यांना दिली होती. यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी याबाबत सरकारने निर्णय घ्यावा असे राज्यपाल यांनी निर्णय दिला आहे. राज्यपालांच्या या निर्णयाचे दीपक केसरकरांनी स्वागत केलं आहे. यासाठी एकट्याने निर्णय घेणं योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

मनोवैज्ञानिक आणि बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी