27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराम मंदिराच्या उद्घाटनाला आडवाणींना न येण्याची विनंती; तर 'हे' बॉलिवूड कलाकार लावणार...

राम मंदिराच्या उद्घाटनाला आडवाणींना न येण्याची विनंती; तर ‘हे’ बॉलिवूड कलाकार लावणार उपस्थिती

देशात पुढील महिन्यात राम मंदिराचे (ram mandir) उद्घाटन होणार आहे. अनेक वर्षांपासून राम मंदिर बांधण्यासाठी भाजपाने आंदोलने केली होती. काही आंदोलनं आजही लक्षात आहेत. हे राम मंदिर बांधण्यासाठी अनेकदा कॉंग्रेसने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा भाजपाने अनेकदा दावा केला होता. मात्र आता हे राम मंदिर दिमाखात उभं झालं आहे. या मंदिराचे उद्घाटन पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र या उद्घाटनाला ज्या व्यक्तींनी आंदोलनं केली, त्यांनाच राम मंदिराच्या उद्घाटनाला न येण्याची विनंती केली असल्याची चर्चा आहेत.

राम मंदिरासाठी ९० च्या दशकामध्ये आडवाणी आणि मनोहर जोशींनी आंदोलनं केली होती. मात्र आता त्यांनाच राम मंदिराच्या उद्घाटनाला न बोलावल्याचे कारण आता समोर आले आहे. दोघांची प्रकृती आणि वय हे जास्त असल्याने त्यांना येऊ नये असे सांगितले असून त्यांनीही ते मान्य केलं असल्याची माहिती राम मंदिराचे ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.

आडवाणी आणि जोशी यांनी राम मंदिरासाठी अनेक आंदोलनं केली आहेत. त्यावेळी रथयात्र काढण्यात आल्या होत्या. या रथयात्रेचा आश्वासक चेहरा हा लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आहे. यामुळे हे दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. कारण मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी यांचं वाढतं वय पाहूण त्यांना उद्घाटनासाठी न येण्याची विनंती करण्यात आली आहे. राम मंदिराचे उद्घाटन हे पुढील २२ जानेवारी महिन्यात होणार आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा होणार असून जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासह बॉलिवूड आणि इतर उद्योजकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

हे ही वाचा

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार चैन की निंद; शाळेच्या वेळेत होणार बदल

‘खडसेंच्या डोक्यात बिघाड झालाय का’?

‘चमचे का वाजताहेत’; धारावी मोर्च्यावरून उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार

बॉलिवूड कलाकार लावणार उपस्थिती

राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पुढील जानेवारी महिन्यात २२ तारखेला होणार आहे. यासाठी देशभरातील प्रतिष्ठित मान्यवर हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी दलाई लामा, योग गुरू बाबा रामदेव, सिने अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षीत, मधुर भांडारकर, अरुण गोविल, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक निलेश देसाई आणि इतर मान्यावर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी