24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeक्रिकेटमोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित, पुरस्कारानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित, पुरस्कारानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

आज विविध राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण सोहळा देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Draupadi murmu) यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे पुरस्कारांचे मानकरी सर्वाधिक आनंदी आहेत. देशाच्या राष्ट्रपतींकडून मिळणारा मानसन्मान हा आपल्या कार्याच्या उन्नतीत भर घालणारा आहे. अशातच आता अर्जुन पुरस्काराचा (Arjuna Award) मानकरी म्हणून त्याची आजपासून एक वेगळी ओळख झाली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad shami) आहे. शमीने आपल्या गोलंदाजीने अनेकांची मनं जिंकली आहेत. शमीचा इथवरचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी आहे. मग त्याचं वैयक्तिक जीवन असो वा त्याच्या क्रिकेट खेळाबाबत. तो नेहमी एका मजबूत स्थितीत आपलं काम करत असतो. यासाठी वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. अशातच शमीला मिळालेल्या अर्जुन पुरस्काराने आईच्या डोळे पाणावले.

शमीचे आपले स्वत:चे आयुष्य हे फारच विचित्र परिस्थितीत जगत होता. घरातील मानसिक त्रास, कौटुंबिक समस्या, कलह पत्नीने केलेले आरोप यामुळे मोहम्मद शमी पूरता खचून गेला होता. यामुळे त्याने अनेकदा आपले क्रिकेट करीअर संपवण्याचा निर्णय घेतला होता. काही वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता. काही महिन्यांआधी झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याला दुखापत  झाली. यामुळे मोहम्मद शमीला संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यानं सोनं केलं आहे. एकेकाळी एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मोहम्मद शमीने क्रिकेट विश्वात पुन्हा एकादा कमबॅक केलं आहे.

हे ही वाचा

‘अमित ठाकरे यांनी मला शिवीगाळ केली आणि डोक्यात भारदस्त वस्तूंनं मारल्याने सहा टाके पडले’

मनोज जरांगेंच्या कुटुंबाची कुणबी नोंद सापडली

‘मी निवडणूक लढवणार नाही’

पत्नी जहॉमुळे शमीला विविध समस्याला तोंड द्यावं लागत होतं. पत्नीने केलेल्या आरोपामुळे तो मानसिक ताणावाला बळी पडला होता. अनेकदा तो आपल्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन माध्यमांसमोर बोलत असायचा. मात्र शमीच्या या दमदार कामगिरीने अनेकांचे डोळे उघडले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने शमीने आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

पुरस्कारानंतर शमीची पहिली प्रतिक्रिया

अर्जुन पुरस्कारानंतर मोहम्मद शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हा खेळ माझा खूप आवडीचा आहे. हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. मी यासाठी यशस्वी होण्यासाठी खूपच मेहनत घेतो. माझं स्वप्न साकार करण्यासाठी कुटुंबाने मला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचा आभारी आहे. अमरोह ते टीम इंडियाचा खेळाडू कसा झालो हे मी सध्या शब्दात सांगू शकत नाही’, असं शमी म्हणाला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी