27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeराजकीय'मोदींच्या वयावरून राजकारणातून बाहेर जावा असं बोलण्याची अजितदादांमध्ये हिंमत आहे?'

‘मोदींच्या वयावरून राजकारणातून बाहेर जावा असं बोलण्याची अजितदादांमध्ये हिंमत आहे?’

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (sharad pawar) यांच्यामध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे आता दोन्ही गटांमध्ये अधिकाधिक टीका टीप्पण्या होताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या काकांना म्हणजेच शरद पवार यांना टार्गेट करत असतात. अनेकदा ते शरद पवार यांच्या वयावरून बोलले आहेत. त्यांनी आशीर्वाद द्यावा. वाढत्या वयानुसार त्यांनी आराम करावा. यावरून शरद पवार यांनी देखील अजित पवार यांना (९ जानेवारी) दिवशी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना वयावरून असं बोलणं सारखं बरं नाही. त्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांना बच्चा म्हणत वयावरून वक्तव्य केलं आहे. यामुळे आता रोहित पवार (rohit Pawar) यांनी अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) देखील ८० वर्षांचे होतील त्यांना राजकारणातून थांबावायची हिंमत आहे का?’, असा सवाल आता रोहित पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यापासून अजित पवार हे शरद पवार यांच्यावर वयावरून अनेकदा बोलले आहेत. ते म्हणाले की, ‘या वयामध्ये आता त्यांनी (शरद पवार) आराम करावा. आशीर्वाद द्यावा. ८० वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना…८४ वय झालं तरीही माणूस थांबायचं नाव घेईना…असं काय चाललंय?’, असा सवाल अजित पवार यांनी केला. यावर शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ‘सारखं सारखं असं बोलणं चांगलं नाही, ‘कार्यकाळ संपल्यानंतर मी निवडणूक लडवणार नाही’, असं ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा

मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित, पुरस्कारानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

‘अमित ठाकरे यांनी मला शिवीगाळ केली आणि डोक्यात भारदस्त वस्तूंनं मारल्याने सहा टाके पडले’

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

दरम्यान काही दिवसांआधी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या भाजपसोबत युती करण्याबाबत टीका केली होती त्या टीकेला अजित पवार म्हणाले की, ‘तु अजून बच्चा आहे बच्चा’, असं म्हणत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर म्हणून रोहित पवार यांनी आपल्या ‘x’ ट्विटर हॅंडेलवर लहान मुलांचं गाण शेअर करत ‘बच्चा मन का सच्चा’, असं म्हणत रोहित पवार यांनी न काही बोलता अजित पवार यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून मिश्किल टीप्पणी केली. यानंतर त्यांनी आता मात्र अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

अजित पवार हे कधी रोहित पवार यांना बच्चा म्हणतात तर कधी शरद पवार यांच वय जास्त झालं असल्याच म्हणत आहेत. दोघांनाही वयावरून बोलत असतात. यावरून आता रोहित पवार यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला आहे. रोहित म्हणाले की, ‘अजित पवार हे मला बच्चा म्हणतात. मी त्यांचा पुतण्या आणि ते माझे काका आहेत. मी त्यांच्यासमोर बच्चा आहे. ते शरद पवार यांना देखील वयावरून बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वर्षात ८० वर्षांचे होतील मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे, अशी म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे का?’, असा रोकठोक सवाल करत रोहित पवार यांनी अजित पवार यांचे कान टोचले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी