27 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeराजकीयमनोज जरांगेंच्या कुटुंबाची कुणबी नोंद सापडली

मनोज जरांगेंच्या कुटुंबाची कुणबी नोंद सापडली

राज्यात अनेक महिन्यांपासून मराठा समाजाने सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समावून घ्यावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange-Patil) आंदोलन करत असून ते आता अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पायी चालत मुंबईच्या आझाद मैदानावर येणार आहेत. आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत. त्यांनी राज्यभरामध्ये विविध भागांमध्ये तालुक्यात, जिल्ह्यामध्ये सभा घेत सराकरला मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत मागणी केली. मात्र सरकार कोणतंही पाऊल उचलत नाही. कुणबी नोंदी प्रमाणपत्र ज्याकडे असतील त्याला कुणबी प्रवर्गात (Kunbi Certificate) समावून घेतलं जाणार असल्याचं सरकार म्हणाले आहे.

कुणबी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावत मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचं कोणतंही दुमत नाही. मात्र ओबीसी समाजाचं आरक्षण घेऊ नका असं छगन भुजबळही वारंवार म्हणत आहेत. अशातच काही दिवसांपासून मराठा समाजातील काही लोकांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचं अनेकदा बोललं जात आहे. अशातच अंतरवाली सराटी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबामध्ये कुणबी नोंद नसल्याच्या चर्चा होत्या मात्र आता नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा

‘मी निवडणूक लढवणार नाही’

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

सलमानच्या फार्महाऊसवर दोन व्यक्तींची घुसखोरी, ओळखपत्रात होतं भलतंच नाव

मनोज जरांगेंच्या कुटुंंबाच्या कुणबी नोंदी सापडल्या

मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समावून घेण्यासाठी मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र यासाठी ज्या मराठा समाजातील कुटुंबामध्ये कुणबी प्रमाणपत्र असेल त्यालाच ओबीसीमध्ये समावून घेणार असल्याचं बोललं गेलं होतं. यावेळी मात्र मनोज जरांगे-पाटील यांच्या कुटुंबामध्ये आणि अंतरवाली सराटीमध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत. मात्र आता शिरूर तहसील कार्यालयामध्ये मनोज जरांगेंच्या पणजोबांच्या दाखल्याची नोंद कुणबी आढळून आली. यावर आता मनोज जरांगे-पाटील यांच्या वडीलांनी स्पष्टोक्ती दिली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे-पाटील यांचे वडील?

मनोज जरांगेंच्या पणजोबांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले आहे. अशातच यावर आता मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ‘ आमच्या गावाच्या नोंदी नव्हत्या. आम्ही गावात शोधल्या पण सापडल्या नाहीत. त्यासाठी आम्ही इकडं (शिरूर) आलो. यावेळी सर्व गावाच्या देखील सापडल्या का? असा प्रश्न विचारला असता तर ते सापडल्याचं म्हणत उत्तरले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी