राज्यात सत्ता संघर्षावरून आरोपप्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यातही आता काही पक्षांमध्ये उभी फुट पडल्याने राजकीय वातावरणामध्ये बदल होऊन बसला आहे. आता शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांममध्ये टीका टीप्पाणी पाहायला मिळते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या शरद पवार यांच्यावर नेहमी एकच टीका करताना दिसत आहे. शरद पवार यांना वयावरून सारखं डिवचत असतात. याआधी देखील शरद पवार यांना त्यांच्या वयावरूनच टीका केली होती. मात्र आता शरद पवार यांनी सारखं सारखं वयावरून बोलणं चांगलं नाही. मी निवडणुकीला उभा राहणार नसल्याचं व्यक्तव्य केलं.
‘निवडणूक लढवणार नाही’
मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, ‘मी आता निवडणूक लढवणार नाही. आणखी काही एक ते दोन वर्षे माझी खासदजारकीचे बाकी आहेत. तोवर मी काम करत राहिलं. मी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहिरपणे सांगितलं आहे. मला माझ्या पक्षाने राज्यसभेमध्ये पाठवलं आहे. ते मी अर्ध्यातून सोडू का? जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत मी काम करणार आणि सहकाऱ्यांशी मदत करणार हे माझं काम आहे. मला संसदेमध्ये पाठवलं आहे’.
निवृतीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये काम कराल?
माध्यमांशी शरद पवार बोलत असताना त्यांना निवृत्तीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल असं विचारलं असता, यावर ते म्हणाले की, ‘काम करताना अनेक क्षेत्र आहेत. साखर उद्योगामध्ये मी लाईफ मेंबर आहे. काही संस्थेमध्ये मी अजीवन सभासद आहे. शिक्षण संस्थेमध्येही काम करता येतं. अनेक संस्थेमध्ये काम करता येतं. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात असायला पाहिजे’, असं शरद पवार यांनी निवृत्तीच्या मुद्द्यावर असताना भाष्य केलं आहे.
हे ही वाचा
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड
सलमानच्या फार्महाऊसवर दोन व्यक्तींची घुसखोरी, ओळखपत्रात होतं भलतंच नाव
आठही महिला पोलिसांकडून पत्र खोटं असल्याचा दावा
‘अशी गोष्ट काढणं योग्य नाही’
अनेकदा अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वयाबद्दल बोलत असताना टीका केली आहे. आपलं वय झालं आहे या वयात आपण शांत बसावं, आशीर्वाद द्यावा, मार्गदर्शन कारावं, असं अनेकदा अजित पवार म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले की, ‘सारखं सारखं अशी गोष्ट काढणं योग्य नाही. वयाचा प्रश्न असेल तर मोरारजी देसाई सुद्धा ज्येष्ठ नेते होते. अनेक नेत्याचं वय वाढलं तरीही ते सक्रिय होते. यामुळे अशा गोष्टी काढणं गरजेचं नाही’, असं शरद पवार म्हणाले आहेत.