27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeराजकीय'अमित ठाकरे यांनी मला शिवीगाळ केली आणि डोक्यात भारदस्त वस्तूंनं मारल्याने सहा...

‘अमित ठाकरे यांनी मला शिवीगाळ केली आणि डोक्यात भारदस्त वस्तूंनं मारल्याने सहा टाके पडले’

नवी मुंबईमध्ये आता मनसे (MNS) विरुद्ध मनसे अशी फाईट सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये वाद झाला आहे. खारघर येथील मेडिकव्हर रूग्णालयाच्या बाहेर हा राडा झाला असून माथाडी कामगारांचे मनसेचे नेते महेश जाधव रूग्णालयामध्ये उपचार घेत असताना मनसे आणि महेश जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. हा राडा आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. महेश जाधव यांच्या समर्थकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारहाण केली आहे. अशातच आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी शिवीगाळ केली असून मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी केला आहे.

मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी आता थेट अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. अमित ठाकरे यांनी शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे त्यांच्यावर मेडिकव्हर या रूग्णालयामध्ये गंभीर आरोप केले आहेत. यावेळी महेश जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. एका सोसायटीमध्ये लपायला गेलेल्या मनसे कार्यकर्त्याला मारण्याच्या नादात सेक्युरीटी रूमची काच फोडल्याने हा गोंधळ आणखीच वाढू लागला आहे.

हे ही वाचा

मनोज जरांगेंच्या कुटुंबाची कुणबी नोंद सापडली

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

‘मी निवडणूक लढवणार नाही’

महेश जाधव यांचे अमित ठाकरेंवर गंभीर आरोप

राज ठाकरे यांच्या घरी बोलावून मला अमित ठाकरे यांनी मारहाण केली असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ केली असल्याचा महेश जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे.

‘अमित ठाकरे यांनी भारदस्त वस्तूने मारहाण केली आणि सहा टाके पडले’

मी माथाडी कामगारांची बाजू घेतली म्हणून मला मारहाण करण्यात आली. अमित ठाकरे यांच्याकडून मला राजगड कार्यालयावर मारहाण केली. मला माथाडी कामगार संघटनेतून कमी करण्यासाठी प्रयत्न दर्शवले होते. पक्षातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. राजगड कार्यालामध्ये काही माथाडी कामगारांसह गेलो असता, माझी बाजू ऐकून न घेता अमित ठाकरे यांनी भारदस्त वस्तूने मारले. यावेळी शिवीगाळ केली आणि डोक्याला सहा टाके पडले असल्याचं महेश जाधव म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी