27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeक्रीडावसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

वसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

क्रिकेट विश्वामध्ये नवनवीन घडामोडी घडत असतात. अशातच जर एखादा खेळाडू अधिकाधीक सोशल मीडिया वापरत असेल तर त्याबाबत अधिक चर्चा होते. पाकिस्तानचा माजी वेगवान खेळाडू वसिम अक्रम (wasim Akram) हा अनेकदा चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांनी केलेल्या कमेंटला प्रतिक्रिया देतो. अक्रम हा स्पष्टपणे बोलतो. तो परखड मतांचा आहे. नुकताचे अक्रमने आपल्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एका चाहत्याने त्याच्या बायकोबद्दल कमेंट केल्याने अक्रम भडकला आहे. त्याने चाहत्यांवर चांगलाच निशाणा लगावला आहे.

अक्रमने पत्नी शनायरासोबत विवाह केला. शनायरा ही एक ऑस्ट्रेलियन महिला आहे. अक्रमच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानं त्याने शनायरासोबत दुसरा विवाह केला आहे. त्याने शनायरासोबत अनेक फोटो सोशल मीडिया हॅंडेलवर शेअर केल्या आहेत. असाच एक फोटो अक्रमने आपल्या पत्नीसोबत शेअर केला आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट केली त्या कमेंटवर अक्रम रागवाला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याने तो फोटो सोशल मीडियवर शेअर केला होता. त्याने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अनेक चाहत्यांनी अक्रमला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी फोटोखाली एका चाहत्याने असभ्य भाषेत कमेंट केली आहे. नेटकरी ‘हॉटवाईफ’ असं म्हणाला आहे. यामुळे अक्रम त्या नेटकऱ्यावर संतापला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wasim Akram (@wasimakramliveofficial)

हे ही वाचा

सत्यशोधक चित्रपट असणार करमुक्त, मंत्रीमंडळामध्ये भुजबळांचा शब्द पाळला

‘आजचा निकाल सर्व जनतेला मान्य असेल’

‘मोदींच्या वयावरून राजकारणातून बाहेर जावा असं बोलण्याची अजितदादांमध्ये हिंमत आहे?’

काय म्हणाला अक्रम?

हॉटवाईफ असं एका नेटकऱ्याने फोटोवर कमेंट केल्याने अक्रम संतापला असून म्हणाल की, असं म्हणणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल अक्रमने केला होता. मला तुमच्या आई वडीलांना भेटायचं आहे आणि सांगायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे कृत्य करताय. असं प्रत्युत्तर देत अक्रमने नेटकऱ्याला खडसावलं आहे.

अक्रमच्या कॅमेंट्रीबाबत थोडक्यात

अक्रम हा क्रिकेट सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅमेंट्री करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्रमची आणखी एक ओळख म्हणजे उत्कृष्ठ इंग्रजी बोलता येणारा खेळाडू म्हणून अक्रमकडं पाहिलं जातं, म्हणून तो आता कॅमेंट्री करत असताना आपल्या भाषा शैलितून एखाद्या सामन्यामध्ये रंगत आणतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी