29 C
Mumbai
Friday, February 23, 2024
Homeराजकीयलोकशाही मराठी वृत्तवाहीनीवर दडपशाही, चॅनेल ३० दिवसांसाठी राहणार बंद

लोकशाही मराठी वृत्तवाहीनीवर दडपशाही, चॅनेल ३० दिवसांसाठी राहणार बंद

राज्यात मराठी माणसांसाठी आवाज उठवणारं आणि खरी बाजू मांडणारी अनेक माध्यम आहेत. अनेक वृत्तपत्र, चॅनेल देशातील आणि राज्यातील घडणाऱ्या घटनांची नि:पक्षपातीपणे तसेच निर्भीडपणे खरी खुरी माहिती लोकांसमोर घेऊन येणारी अनेक माध्यम आहेत. त्यापैकी लोकशाही वृत्तवाहीनीची केंद्र सरकारकडून अनेकदा गळचेपी झाल्याचं पाहायला मिळतं असा अनेकदा आरोप झाला आहे. तसेच काही वर्तमानपत्र, माध्यम केंद्राने विकत घेतली असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र यामध्ये लोकशाही वृत्तवाहिनी माहिती देण्यासाठी आणि प्रसारणासाठी ३० दिवसांसाठी बंद करण्यात आली. वृत्तवाहिनीने कागदपत्र न दिल्याने मंत्रालयाने वृत्तवाहिनी बंद करण्यासाठी सांगितली आहे. ही वाहिनी २६ जानेवारी दिवशी चौथा वर्धापन दीन साजरा करणार होती.

काट्याने काटा

१७ जुलै दिवशी २०२३ भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ लोकशाही माध्यमाने सर्वत्र प्रसारित केला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होण्याआधी लोकशाही वृत्तवाहीनीने प्रसारित केल्यानंतर वाहीनी ७२ तासांसाठी बंद करण्यासाठी सांगितली. यामध्ये भाजपचा हात असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. सोमय्या यांचा प्रसारित केलेला व्हिडीओ आणि लोकशाहीला ७२ तासांसाठी वृत्तवाहीनी बंद ठेवावी लागली. म्हणजे भाजपाने काट्याने काटा काढला होता.

हे ही वाचा

वसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

सत्यशोधक चित्रपट असणार करमुक्त, मंत्रीमंडळामध्ये भुजबळांचा शब्द पाळला

‘मोदींच्या वयावरून राजकारणातून बाहेर जावा असं बोलण्याची अजितदादांमध्ये हिंमत आहे?’

कायद्यावर विश्वास, न्यायालयात दाद मागणार

‘किरीट सोमय्याने व्हिडीओ व्हायरल प्रकरणामध्ये दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आमच्या बाजूने निर्णय दिला होता. यावेळी आम्ही न्यायालयामध्ये जाणार असून आम्हाला न्याय मिळेल, अशी खात्री आहे. तोपर्यत युट्यूबवर आमचे काम सुरू राहील’. अशी माहीती लोकशाहीच्या व्यवस्थापक मोनिशा नायडू यांनी दिली आहे. तर ‘दडपशाहीविरोधात ‘लढेंगे और जितेंगे’ असा निर्धार लोकशाहीचे कमलेश सुतार यांनी केलं आहे.

लोकशाहीमागे मराठी पत्रकार संघ उभा

माध्यमांवर बंदी आणणे हे लोकशाहीसाठी घातक असून लोकशाही वृत्तवाहीनीमागे मुंबई मराठी पत्रकार संघ ठामपणे उभा आहे, अशी भूमिका संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी