27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटविराट कोहलीबाबत सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

विराट कोहलीबाबत सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

देशात काही दिवसांपूर्वीच आयसीसी विश्वचषकाची सांगता झाली. या विश्वचषकात टीम इंडियाने अफलातून कामगिरी केली आहे. एकूण ११ पैकी १० सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत शेवटच्या अंतिम सामन्यात जे व्हायला नको होतं तेच झालं आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरोधात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यामुळे एका पराभवाने टीम इंडियाच्या हातचा वनडे विश्वचषक निसटला आहे.  यानंतर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आता निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोन्ही खेळाडूंचे वय पाहता या वयात अनेक खेळाडू निवृत्त होतात. विराटचे वय हे ३५ असून विराट निवृत्त होईल का अशा चर्चा आहेत. यावर आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने विराट कोहलीबाबत वक्तव्य केलं आहे.  इएसपीएल क्रिकइंफोशी बोलताना तो म्हणाला की, विराट कोहलीकडे अनेक सामने खेळण्याची अधिक क्षमता आहे. तो धावांचा डोंगर उभारू शकतो. देशासाठी खेळण्यासाठी त्याच्यात प्रचंड इच्छा आणि भूक आहे. त्याच्यातील क्रिकेट अजूनही अबाधित आहे. सचिनच्या या वक्तव्यावरून विराट कोहलीने आणखी काही वर्षे खेळावे हे सचिनच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा

जयंत पाटील युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत?

वंदे मातरम, जय हिंद शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवे नियम

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पटकावरणारा पैलवान लोकसभा निवडणूक लढणार?

२०२३ या वनडे विश्वचषकात सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा वर्ल्ड रोकॉर्ड विराट कोहलीने मोडीत काढला असून ५० शतकं आपल्या नावावर विराटने केली आहेत. याबाबत विचारले असता सचिनने सांगितले की, मी आनंदी आहे की हा रेकॉर्ड आपल्या देशाकडे आहे, मी कायम असंच सांगत राहिल की हा रेकॉर्ड देशाचा आहे.

व्हाईट बॉल स्पर्धेतून विश्रांती

विराट कोहलीच्या वनडे विश्वचषकाच्या खेळाचा आलेख पाहता चांगला आहे. विराटने या विश्वचषकात ७६५ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतकी खेळी केली असून ६८ चौकार लगावले आहेत, अशातच सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडीत काढत ५० शतकं पूर्ण केली आहेत. दरम्यान, विराट कोहली काही महिने व्हाईट बॉल स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती विराटने बीसीसीआयला दिली आहे. तो काही महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी