26 C
Mumbai
Thursday, February 1, 2024
Homeराजकीयमनोज जरांगेंच्या सभेचा चौथा टप्पा आजपासून

मनोज जरांगेंच्या सभेचा चौथा टप्पा आजपासून

राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) रान पेटलं आहे. गेली काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange-patil) सभा घेत आहेत आंदोलनं आणि उपोषण करत आहेत. मात्र सरकार यावर कोणतेही पाऊल उचलत नाही. यासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, असं ते सतत म्हणत आहेत. अशातच (१ डिसेंबर) दिवशी मनोज जरांगे-पाटील  महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा जालन्यापासून सुरू करणार आहेत. याआधी त्यांचं जालन्यातील मोंढा परिसरात भाषण होणार आहे. या ठिकाणी ४० एकराच्या भव्य मैदानावर सभा होणार आहे. त्याचप्रमाणे गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने १०० एकर जागेवर पार्कींची सोय करण्यात आली आहे.

याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळांचा याला पूर्ण विरोध असून मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका करायला सुरुवात केली. यांनतर भुजबळांनी देखील ओबीसी एल्गार सभा घेत मनोज जरांगेंवर हल्ला बोल केला. दरम्यान जालन्यात जरांगे नेमकं काय बोलतील याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. जालन्यात मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेल्या १४० जेसीबींची व्यवस्था करण्यात आली आहे. २० हजार दुचाकीच्या माध्यमातून रॅली काढण्यात येणार असून ४० चौरस फुटांचे कटआऊट्स आणि होर्डिंग्स लावले आहेत. पोलिसांसह सकल मराठा समाजाचे दहा हजार स्वयंसेवक गर्दीचे नियोजन संभाळण्यासाठी उपस्थित असणार आहेत.

खानदेश आणि विदर्भातील काही गावांमध्ये मनोज जरांगे जाणार आहेत. ग्रामीण भागातील लोकांशी भेट घेणार आहेत. तर पाचव्या टप्प्यात जरांगेंचे कोकण दौऱ्यावर लक्ष असणार आहे.

हे ही वाचा

विराट कोहलीबाबत सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

जयंत पाटील युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत?

वंदे मातरम, जय हिंद शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवे नियम

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौथ्या टप्पात नांदेड येथे सभा असणार असून त्यांच्या इतर तीन सभा होणार आहेत. मनोज जरांगे-पाटील यांची सर्वात मोठी सभा ही वाडी पाटी येथे पार पडणार असून या ठिकाणी सर्वाधिक १११ एकरचं मोठं मैदान असणार आहे. या मैदानावर जरांगेंची भव्य सभा असणार आहे. या सभेत जरांगे काय वक्तव्य करतील, यावर आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी