29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमनोरंजनसल्लू भाई का बड्डे; चाहत्यांना देणार 'असं' काही गिफ्ट

सल्लू भाई का बड्डे; चाहत्यांना देणार ‘असं’ काही गिफ्ट

बॉलिवूडचा दबंग, टायगर सल्लू अर्थातच अभिनेता सलमान खानचा आज ५८ वा वाढदिवस आहे. याच्या वाढदिवसाची चर्चा केवळ भारतात नाही तर जगभरात आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी सलमान आपल्या चित्रपट क्षेत्रामध्ये तग धरून आहे. भारताप्रमाणे जगभरामध्ये सलमान खानचे चाहते आहेत. आजचा दिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणाप्रमाणे आहे. सलमानचे काही चित्रपट सोडता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्याला त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो आपल्या चाहत्यांना दरवर्षी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून काहीना काही गिफ्ट देत असतो. सलमान खानचं पूर्ण नाव हे अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे.

सलमानला २०२३ हे वर्षे चित्रपटासाठी फरसं चांगलं गेलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आगामी २०२४ मध्ये सलमान खान नवीन वर्षात नवीन चित्रपट करणार असल्याचं समजतं. दरम्यान सलमान खान हा नेहमीच आपल्या गॅलेरी अपार्टमेंटमध्ये आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी येत असतो. आजही सलमान खान आपल्या अपार्टमेंटमध्ये चाहत्यांना भेटायला येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार सलमान खानचे एक नाही, दोन नाही तर एकूण ५ चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

हे ही वाचा

‘भीमा कोरेगाव कार्यक्रम सरकारच्या निधीतून पार पडावा’

‘आला बैलगाडा’ गाण्यावर अजितदादा फिदा

नरेंद्र मोदीच देशाचे तिसरे पंतप्रधान; नाना पाटेकरांचं विधान चर्चेत

करणच्या आगामी सिनेमामध्ये सलमान खान

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर आणि सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमामध्ये सलमान खान काम करणार आहे. त्याचप्रमाणे ‘टायगर वर्सेस पठाण’ या सिनेमाबद्दलही माहिती समोर येत आहे. सलमानने आपल्या चित्रपटाची पहिली कमाई ही ७५ रूपयांनी केली होती. त्यावेळी त्याने सहाय्य दिग्दर्शनाची भूमिका बजावली होती. फिल्मी करिअरच्या सुरूवातीला सहाय्य दिग्दर्शन म्हणून काम करावं लागलं आहे.

‘बीवी होतो ऐसी’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं आहे. ‘मैने प्यार कीया’ या चित्रपटातून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच आपल्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त आपली भाची आयतसोबत केक कापत वाढदिवस साजरा केला आहे.

सलमानच्या वाढदिवशी बॉबी देओलची उपस्थिती आणि गालाला चुंबन

सलमाने आपला ५८ वा वाढदिवस रात्री १२ वाजता कुटुंबियांच्या सानिध्यात केक कापत साजरा केला आहे. यावेळी आपली भाची आयतसोबत त्याने केक कापला. सलमानच्या वाढदिवशी बॉबी देओलनेही हजेरी लावली आहे. बॉबी देओलने सलमान खानच्या गालाचे चुंबन घेत सलमानबाबतचे प्रेम व्यक्त केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी