33 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला होणार रवाना

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला होणार रवाना

राज्यात आगामी लोकसभा निवडणुका येत्या मे महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकांवर लक्ष घालत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टिप्पणी करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळत आहेत. याआधी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील नागपूरमध्ये जाऊन मोर्चा काढला आहे. अशातच आता अहमदनगरचे कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात असून त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना येथे काही दिवसांआधी नागपूरला सभा घेण्याबाबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सचिन गुजर, हिरालाल पगडाल, गणपतराव सांगळे, अशोक कानडे, सुरेश थोरात, संतोष हासे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे,नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे,ज्ञानेश्वर मुरकुटे, सौ.अर्चना बालोडे,सौ.पद्माताई थोरात,सुधाकर नवले, आनंद वरपे, आकाश नागरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर,योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, करण ससाने, हेमंत ओगले, नगर शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब दिघे उपस्थित होते.

हे ही वाचा

सल्लू भाई का बड्डे; चाहत्यांना देणार ‘असं’ काही गिफ्ट

‘भीमा कोरेगाव कार्यक्रम सरकारच्या निधीतून पार पडावा’

‘आला बैलगाडा’ गाण्यावर अजितदादा फिदा

धीरज गुजर यांच्याकडून बाळासाहेबांचं कौतुक

यावेळी धीरज गुजर यांनी बाळासाहेब थोरात यांचं कौतुक केलं आहे. ज्यावेळी विखे कॉंग्रेस सोडून गेले त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यावेळी कॉंग्रेस पक्षाला ४४ आमदार निवडून दिले. पक्षाला त्यांनी चांगल्या स्थितीत मजबूत केलं आहे. अडचणीच्या काळात ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली अशाच नेत्यांना जनता कायम लक्षात ठेवते तर पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार असल्याचेही गुजर म्हणाले.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूरला होणार रवाना

कॉंग्रेस पक्षाने आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आता हजारो कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत .नगर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेससाठी अतिशय चांगले वातावरण असून प्रत्येक तालुकाध्यक्षांनी मोठ्या ताकदीने कामाला लागावे असं आवाहन राजेद्र नागवडे यांनी केलं आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी