28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटटीम इंडियाचा T-20 संघ निश्चित; सूर्यकुमार यादव कर्णधार तर...

टीम इंडियाचा T-20 संघ निश्चित; सूर्यकुमार यादव कर्णधार तर…

आयसीसी वनडे विश्वचषकात भारताने चांगली खेळी केली. सलग दहा सामने जिंकून विरोधकांना घरचा रस्ता दाखवला. मात्र अंतिम सामन्यात जे व्हायला नको होतं तेच झालं आहे. शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या विश्वचषकानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India Vs Australia) T-20 मालिका होणार आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा खेळताना दिसणार नाहीत. तर आता यंग ब्रिगेडला खेळण्याची संधी दिली गेली आहे. हार्दिक पांड्या T-20 मालिकेसाठी कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. मात्र हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा दुखापतग्रस्त असल्याने त्याला देखील विश्रांती देण्यात आली असून नवीन संघांचा भरणा असलेली खेळाडूंची यादी (२० नोव्हेंबर) दिवशी निश्चित करण्यात आली आहे.

विश्वचषक संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलिया आणि इंडिया ट्वेंटी ट्वेंटी मालिकेकडे सर्वांचे लागले आहे. हार्दिक पांड्या ऐवजी सूर्यकुमार यादव हा कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. तर ऋतुराज गायकवाड हा उपकर्णधार असणार आहे. या संघात सर्व नवख्या खेळाडूंना खेळण्यासाठी संधी दिली आहे. पुढच्या वर्षी T-20 वर्ल्डकप होणार असून आतापासून या संघाची बांधणी करण्यात येणार आहे. या संघाचे प्रशिक्षण राहुल द्रविड नसतील. त्यांचा करार संपत आल्याचे समजत आहे. मात्र पुन्हा एकदा नाव करार त्यांच्यासोबत होईल का? याबाबत अजूनही कोणताही खुलासा झाला नाही.

हे ही वाचा

‘राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी’; चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोवर फडणवीसांचे वक्तव्य

सहकुटुंबासोबत बावनकुळे; फोटो शेअर करत दिली माहिती

संजय राऊत आणि बावनकुळेंच्या ‘त्या’ फोटोवरून ट्विट वाॅर

ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया T20 वर्ल्डकप वेळापत्रक

23 नोव्हेंबर पहिला T20 सामना विशाखापट्टणम
26 नोव्हेंबर दुसरा T20 सामना तिरुवनंतपुरम
28 नोव्हेंबर तिसरा T-20 सामना गुवाहाटी
1 डिसेंबर चौथा T-20 सामना रायपूर
3 डिसेंबर पाचवा T-20 सामना बेंगळुरू

टीम इंडिया संघ T -20 सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी