27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeराजकीय'समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते; वाढवण्यासाठी नव्हे'; आव्हडांचा संताप

‘समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते; वाढवण्यासाठी नव्हे’; आव्हडांचा संताप

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC) (Maratha reservation) प्रश्न सोडवणे खूप कठीण होऊन बसले आहे. मूळ मुद्दा बाजूला राहत असूनही देशात आंदोलन होत आहे, उपोषण होत आहे. यामुळे राज्याची स्थिती आणखीच अवघड होऊन बसली आहे. दोन्ही समाजात कलह, वाद निर्माण होत असल्याने आरक्षणाच्या मुद्दा सुटत नाही. ओबीसी समाज मराठा समाजाला सामावून घेत नसल्याने परिस्थिती बिकट होत आहे. मराठा समाजाने मोर्चे काढले म्हणून आता ओबीसी नेते छगन भुजबळही सभा घेत आहेत यावर राज्यातील काही नेत्यांनी हा मुद्दा मंत्रीमंडळात मांडावा असे भुजबळांना आवाहन केले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांना समस्या सोडवण्यासाठी सत्ता असते वाढवण्यासाठी नव्हे असे वक्तव्य करत भुजबळांना फटकारले आहे.

मराठा आणि ओबीसी समाजात सभा होत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला सामावून घ्या अशी मागणी करत आहेत. मात्र ओबीसी समाज आणि नेते छगन भुजबळ या मागणीला विरोध करत आहेत. भुजबळ हे सत्तेत असूनही सभा घेत आहेत. त्यांनी हा प्रश्न मंत्रीमंडळात सोडवावा असे सत्ताधारी आणि काही विरोधी नेत्यांनी सांगितले आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले असून लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची आणि समस्यांवर तोडगा काढण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा

टीम इंडियाचा T-20 संघ निश्चित; सूर्यकुमार यादव कर्णधार तर…

‘राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी’; चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोवर फडणवीसांचे वक्तव्य

सहकुटुंबासोबत बावनकुळे; फोटो शेअर करत दिली माहिती

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

महाराष्ट्राच्या एकजुटीची शकलं पाडण्याचं काम सध्या सुरू आहे. राजकीय फायद्यासाठी इथे सत्ताधारीच जाहीरपणे भडक विधानं करून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचं काम करतायत. आरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय आहे, त्याच्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने व्यावहारिक तोडगा काढायला हवा. विधानांना विधानांनी प्रत्युत्तर देऊन त्याला थिल्लर रिअॅलिटी शो पातळीवर उतरवू नका. छगन भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. ते विशिष्ट वर्गातून येत असले तरी सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडून सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची आणि समस्यांवर तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. राज्याचं सामाजिक स्वास्थ बिघडवण्याची अपेक्षा नाही.

सत्ता समस्या सोडवण्यासाठी असते

सत्ता समस्या सोडवण्यासाठी असते, समस्या वाढवून ठेवण्यासाठी नव्हे. आपलेच सहकारी मंत्री मुनगंटीवार म्हणतात की कॅबिनेटमध्ये विषय मांडायला हवा जाहिर सभेत नाही हेच आमचे पण म्हणणे आहे कैबिनेट मध्ये निर्णाय होतात ओबीसी विरुद्ध तिथे तुम्ही बोलत नाही आणि बाहेर मात्र, महाराष्ट्र चे समाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही ही आपल्या सगळयांची जबाबदारी आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी